Advertisement

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन

७२ व्या वर्षी सरोज खान यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन
SHARES

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिक सरोज खान (Saroj Khan) यांचं मुंबईत निधन झालं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मध्यरात्री त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. ७२ व्या वर्षी सरोज खान यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सरोज खान यांना १७ जूनला वांद्रे इथल्या गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल, असं देखील त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत होत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. या कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण गुरुवारी मध्यरात्री त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.  

सरोज खान यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे नृत्य दिग्दर्शित केलं होतं. बॉलिवूडमधल्या अनेक हिट गाण्यांचं त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या शिकवलेल्या नृत्यामुळे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं करिअर झालं आहे.

१९८३ साली त्यांनी 'हिरो' चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केलं. नृत्यदिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट 'कलंक' हा आहे. याशिवाय त्यांनी मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नागीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका " या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.



हेही वाचा

ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा