Advertisement

ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन


ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक लीलाधर कांबळी यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. गेली दोन वर्षं ते कॅन्सरशी लढा देत होते. रात्री ९ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ते नोकरी करत असत. ही नोकरी सांभाळूनच त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. 'काचेचा चंद्र', ‘हिमालयाची सावली’, ‘कस्तुरी मृग’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आमच्या या घरात’, ‘शॉर्टकट’, ‘दुभंग’ अशा सुमारे 30 हून अधिक नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘वात्रट मेले’ नाटकातील ‘पेडणेकर मामा’, ‘केला तुका नी झाला माका’मधील ‘आप्पा मास्तर’, ‘वस्त्रहरण’ नाटकातील ‘जोशी मास्तर’ अशा त्यांच्या भूमिका गाजल्या.

'भाकरी आणि फूल’, ‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या टीव्ही मालिकांमधूनही त्यांनी काम केलं होतं.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा