मुन्नाभाई आणि सर्किट पुन्हा एकत्र

'हाऊसफुल ४'चे दिग्दर्शक फरहाद समजी यांच्या एका चित्रपटात दोघं काम करणार आहेत. मुन्नाभाई चित्रपटाचा पुढचा भाग येईल तेव्हा येईल तोपर्यंत प्रेक्षकांनी त्यांच्या दुसऱ्या आगामी चित्रपटावर समाधान मानून घ्या

SHARE

मुन्नाभाई आणि सर्किट यांची जोडी पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे.  पण मुन्नाभाईच्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा वगैरे नाही झाली. तर एका दुसऱ्याच चित्रपटासाठी संजय दत्त आणि अर्शद वारसी एकत्र येत आहेत

'हाऊसफुल ४' चे दिग्दर्शक फरहाद समजी यांच्या एका चित्रपटात दोघं काम करणार आहेत. चित्रपटात संजय दत्त एका आंधळ्या डॉनची भूमिका साकारत आहे. तर अर्शद वारसी त्याच्या डोळ्यांची. थोडक्यात संपूर्ण चित्रपटात अर्शद त्याला मार्गदर्शन करणार आहे. साजिद-फरहादची यांची ही कथा आहे. हा मजेदार चित्रपट असून पुढच्या वर्षी मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान चित्रीकरणाला सुरुवात होऊ शकते

तब्बल सहा वर्षांनी दोघंही पुन्हा एकत्र येत आहेत. मुन्नाभाई चित्रपटानंतर त्यांनी एकत्र 'जिल्हा गाझियाबाद' हा चित्रपट केला होता. चित्रपटातील दोघांच्या भूमिकेचं फार कौतुकही झालंखरंतर दोघांना मुन्नाभाईच्या पुढच्या भागात एकत्र बघण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यानुसार मुन्नाभाईच्या पुढच्या भागाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला 'मुन्नाभाई चले अमेरिका' असं चित्रपटाचं नाव होतं. याचा ट्रेलरही यु-ट्युबवर तुम्हाला पाहता येईल


'मुन्नाभाई चले अमेरिका' हा चित्रपट येईल तेव्हा येईल तोपर्यंत प्रेक्षकांनी त्यांच्या आगामी चित्रपटावर समाधान मानून घ्या.  हेही वाचा

आलियाचा हॉट अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल Wow

पानिपतचा ट्रेलर पाहून आली बाजीराव मस्तानी, पद्मावतची आठवण


संबंधित विषय
ताज्या बातम्या