Advertisement

रणवीरचा ‘८३’, तर शाहरुखचा क्लास आॅफ ‘८३’!

दिग्दर्शक कबीर खान सध्या रणवीर सिंगसोबत ‘८३’ हा चित्रपट बनवत आहेत, तर शाहरुख खानही ‘क्लास आॅफ ८३’ नावाचा नवीन चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे.

रणवीरचा ‘८३’, तर शाहरुखचा क्लास आॅफ ‘८३’!
SHARES

बऱ्याचदा एकच कथानक किंवा शीर्षकासारखे बरेच चित्रपट बनतात. दिग्दर्शक कबीर खान सध्या रणवीर सिंगसोबत ‘८३’ हा चित्रपट बनवत आहेत, तर शाहरुख खानही ‘क्लास आॅफ ८३’ नावाचा नवीन चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे.


एक यशस्वी निर्माता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखनं सध्या ‘क्लास आॅफ ८३’ या आपल्या आगामी चित्रपटावर लक्ष केंद्रित केलं आहे. शाहरुख हा एक यशस्वी निर्माता आहे. होम प्रोडक्शनमध्ये तयार झालेल्या ‘झीरो’नं शाहरुखचा घात केल्यानंतर ‘बदला’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळंच शाहरुख आता वेगवेगळ्या प्लॅटफार्म्सच्या माध्यमातून चित्रपट निर्मिती करण्यासाठी सज्ज झाला आहे. यात सध्या पाॅप्युलर असलेल्या नेटफ्लिक्सचाही समावेश आहे. 


नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

शाहरुखची निर्मिती असलेला ‘क्लास आॅफ ८३’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचं समजतं. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘८३’ आणि शाहरुखची निर्मिती असलेल्या ‘क्लास आॅफ ८३’ या दोन्ही चित्रपटांच्या शीर्षकात साम्य असलं तरी, त्यांचा आपसात काहीही संबंध नाही. शाहरुखच्या चित्रपटात बाॅबी देओल मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपट १९८३ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या रियुनियनवर आधारित असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. 


बाॅबी देओल पहिली पसंती 

या चित्रपटासाठी बाॅबी देओल ही शाहरुखची पहिली पसंती आहे. शाहरुख आणि बाॅबी यांच्यात खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मागील काही दिवसांपासून बाॅबी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असून, शाहरुखलाही वेब प्लॅटफार्मवर लक्षवेधी कामगिरी करायची आहे. त्यामुळं ‘क्लास आॅफ ८३’ च्या निमित्तानं दोघांचे उत्तम गुण जुळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचं समजतं.हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा