ख्रिसमस पूर्वी अवतरणार चुलबुल पांडे

चुलबुल पांडे म्हटलं की सलमान खानचा चेहरा डोळ्यांसमोर आलाच म्हणून समजा. 'दबंग' चित्रपटाच्या सिरीजमधील हाच चुलबुल पुन्हा एकदा अबालवृद्धांना वेड लावण्यासाठी येत आहे.

  • ख्रिसमस पूर्वी अवतरणार चुलबुल पांडे
SHARE

चुलबुल पांडे म्हटलं की सलमान खानचा चेहरा डोळ्यांसमोर आलाच म्हणून समजा. 'दबंग' चित्रपटाच्या सिरीजमधील हाच चुलबुल पुन्हा एकदा अबालवृद्धांना वेड लावण्यासाठी येत आहे.

ख्रिसमसचा मुहूर्त

वर्षभरातील सण पाहून त्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीत फार वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. बॅालीवुडमधील आघाडीचे स्टार अशा मुहूर्तांवर आपले चित्रपट प्रदर्शित करत बॅाक्स आॅफिसवर धमाल उडवून देतात हे चित्र आपण मागील बऱ्याच वर्षांपासून पहात आलो आहोत. त्यामुळंच दिवाळी किंवा ख्रिसमससारख्या मोठ्या सणांना कोणते चित्रपट प्रदर्शित होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं. यंदा मात्र ख्रिसमसला नव्हे तर ख्रिसमसपूर्वी म्हणजेच सांताक्लॅाजच्या आगमनापूर्वीच सिनेमागृहांमध्ये चुलबुल पांडे अवतरणार असल्याची माहिती मिळाली आहे.


२० डिसेंबरला प्रदर्शित

होय, सलमानच्या 'दबंग ३' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आपल्या खास शैलीत २० डिसेंबरला चुलबुल देशभरातील सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे. 'दबंग' आणि 'दबंग २' नंतर 'दबंग ३'मध्ये प्रेक्षकांना त्यांचा लाडका सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या रूपात भेटणार आहे. यामुळं यंदा ख्रिसमसला सलमानच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत होणार यात शंका नाही, पण सर्वसामान्य सिनेरसिकांनाही सिनेमागृहांमध्ये एक धडाकेबाज मनोरंजन सोहळा पाहण्याची संधी मिळणार आहे.


तीन भाषांमध्ये 

'दबंग ३' चं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं आहे. 'वाँटेड'च्या यशानंतर 'दबंग ३'च्या निमित्तानं सलमान आणि प्रभू देवा ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. हिंदीसह कन्नड, तमिळ आणि तेलुगू या तीन दक्षिणात्य प्रादेशिक भाषांमध्ये हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान आणि सोनाक्षी सिन्हा या जोडीचा आॅनस्क्रीन रोमांस पाहण्याची संधी मिळणार आहे. या दोघांसोबत या चित्रपटात सुदीप, सई मांजरेकर, अरबाज खान, माही गिल, टिनू आनंद, निकितीन धीर, प्रमोद खन्ना, पंकज त्रिपाठी, नवाब शाह, अभिलाष चौधरी, महेश मांजरेकर आदी कलाकारांनी काम केलं आहे.हेही वाचा -

स्टेशन मास्टरच्या रूपात सलमान खान

सावधान! 'निम्मा शिम्मा राक्षस' आलाय
संबंधित विषय
ताज्या बातम्या