Advertisement

स्टेशन मास्टरच्या रूपात सलमान खान

सलमान खान काहीही करतो ते नावीन्यपूर्ण असतं. आता तो स्टेशन मास्टरच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. कोणत्याही सिनेमात तो या वेषात दिसणार नसून, बिग बॉसच्या नवीन पर्वात सलमानचं हे रूपडं दिसणार आहे.

स्टेशन मास्टरच्या रूपात सलमान खान
SHARES

सलमान खान काहीही करतो ते नावीन्यपूर्ण असतं. आता तो स्टेशन मास्टरच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. कोणत्याही सिनेमात तो या वेषात दिसणार नसून, बिग बॉसच्या नवीन पर्वात सलमानचं हे रूपडं दिसणार आहे.

कृपया इकडे लक्ष द्या! बिग बॉस प्रवासाला सुरूवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. धक्के, आश्चर्य आणि नाट्ये भरलेल्या सफरीवर तुम्हाला घेऊन जाणार आहे. या रोमांचक प्रवासाची सुरूवात सलमान खान करणार असून, स्पर्धकांना त्यांचं कौशल्य दाखवावं लागणार आहे. कारण आधीपेक्षा ठिकाण जवळ असणार आहे. बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींचा समावेश असणार आहे. त्या पंचमुळं सुरूवातीपासूनच सीझनचा मनोरंजनाचा ग्राफ उंचावला जाणार आहे.

शोच्या राज्यकर्त्या होस्ट सलमान खाननं नुकताच एक प्रोमो शूट केला आहे. या प्रोमोत तो स्टेशन मास्टराच्या वेशात नवीन सीझनची घोषणा करत आहे. केबिनमध्ये बसलेल्या रेल्वेच्या हादऱ्यांनी हलणारा सलमान नवीन सीझनची संकल्पना आणि अपेक्षेप्रमाणे तो वेगवान शो कसा बनणार आहे हे स्पष्ट करताना दिसणार आहे. स्टेशन मास्टरचा वेश आणि टोपी परिधान करून सलमाननं प्रोमोमध्ये आपल्या अनोख्या शैलीचा तडका दिला आहे. त्यामुळं बिग बॉसचा नवीन सीझन आता सुरू होत असून, तुमचे सुरक्षा बेल्ट बांधून बसा आणि मनोरंजनाच्या सफरीचा आनंद घ्या.हेही वाचा -

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत सागर देशमुखची एण्ट्री

'सिंधू' मालिकेत सुरू झाली लगीनघाई
संबंधित विषय
Advertisement