Advertisement

सावधान! 'निम्मा शिम्मा राक्षस' आलाय

अभिनेता, लेखक, गीतलेखक, दिग्दर्शक अशी चतुरस्र कामगिरी बजावणाऱ्या चिन्मय मांडलेकरच्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकानं महाराष्ट्रातील बच्चे कंपनींसह थोरांनाही अक्षरश: वेड लावलं आहे. याच वातावरणात चिन्मयनं स्वदिग्दर्शनाखाली तयार झालेलं 'निम्मा शिम्मा राक्षस' हे

SHARES

अभिनेता, लेखक, गीतलेखक, दिग्दर्शक अशी चतुरस्र कामगिरी बजावणाऱ्या चिन्मय मांडलेकरच्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकानं महाराष्ट्रातील बच्चे कंपनींसह थोरांनाही अक्षरश: वेड लावलं आहे. याच वातावरणात चिन्मयनं स्वदिग्दर्शनाखाली तयार झालेलं 'निम्मा शिम्मा राक्षस' हे नवं कोरं बालनाट्य रंगभूमीवर आणलं आहे. 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार हिनं या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर एंट्री घेतली आहे. तिच्या जोडीला नाट्यरसिकांचा लाडका मयुरेश पेम मुख्य भूमिकेत असून, निम्मा शिम्मा राक्षस हा टायटल रोल अंकुर वाढवे साकारत आहे.


ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी लिखीत आणि अद्वैत थिएटर्स निर्मित या नाटकाचा चौथा प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडला. या प्रसंगी चिन्मय मांडलेकरसह मुख्य कलाकारांनी 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली. राहुल भंडारे यांनी या नाटकाची निर्मिती केली असून, गोट्या सावंत सूत्रधार आहेत. दिग्दर्शनासोबतच या नाटकाचं गीतलेखनही चिन्मयनंच केलं आहे. 'अलबत्या गलबत्या'च्या अभूतपूर्व यशानंतर 'निम्मा शिम्मा राक्षस' या नाटकाच्या निमित्तानं रत्नाकर मतकरी, चिन्मय मांडलेकर आणि राहुल भंडारे हे त्रिकूट पुन्हा एकदा एकत्र आलं असून, इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झालं आहे.हेही वाचा-

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत सागर देशमुखची एण्ट्री

'सिंधू' मालिकेत सुरू झाली लगीनघाईसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा