Advertisement

'पद्मावती'च्या 'एक दिल एक जान' मध्ये शाहिद-दीपिकाची लव्ह केमिस्ट्री!


'पद्मावती'च्या 'एक दिल एक जान' मध्ये शाहिद-दीपिकाची लव्ह केमिस्ट्री!
SHARES

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटातील घुमर हे गाणं प्रदर्शित झालं आणि तुफान गाजलं. आता त्यानंतर चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. 'एक दिल एक जान' असे या गाण्याचे बोल आहेत.



'एक दिल एक जान' या गाण्याला खुद्द भन्साळी यांनी संगीत दिलं आहे. तर गायक शिवम पाठकनं या गाण्याला आवाज दिला आहे. गीतकार ए एम तुराझनं हे गाणं लिहलं आहे. राणी पद्मिनी आणि महारावल रतन सिंह यांच्यामधील प्रेम या गाण्यातून दाखवण्यात आलं आहे. शाहिद आणि दीपिकावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. एका बाजूला राणी हसत हसत आपल्या राजाला युद्धासाठी तयार करते, तर दुसऱ्या बाजूला राजापासून विरहाच्या दु:खात राणीचे अश्रू अनावर होतात.

या सिनेमाच्या रूपाने पहिल्यांदाच दीपिका आणि शाहिद स्क्रिन शेअर करत आहेत. तर रणवीर सिंहनं देखील या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. रणवीर या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत झळकणार असून अलाउद्दीन खिलजीची भूमिका तो साकारणार आहे. रणवीर सिंहची ही भूमिका आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा हटके आणि वेगळी आहे. त्यामुळे एकूणच प्रेक्षकांमध्ये 'पद्मावती' विषयी प्रचंड उत्सुकता आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

'पद्मावती'त 'तो' सीनच नाही, भन्साळी यांनी सोडलं मौन!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा