Advertisement

दीपिका पादुकोण आणि संजय भन्साळी पुन्हा एकदा एकत्र, या चित्रपटात झळकणार

दीपिकानं याआधी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारखे हीट चित्रपट भन्साळी यांच्यासोबत केले आहेत.

दीपिका पादुकोण आणि संजय भन्साळी पुन्हा एकदा एकत्र, या चित्रपटात झळकणार
SHARES

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.

गेले काही दिवस संजय लीला भन्साळी हे त्यांचे जुने प्रोजेक्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘हिरा मंडी’ यामध्ये व्यस्त होते. पण आता त्यांच्या नव्या चित्रपटांची लवकरच घोषणा होणार आहे. भन्साळींचा दीपिकासोबत एक मेगा प्रोजेक्ट असणार आहे. यात दीपिका एका राणीची भूमिका साकरणार आहे. ‘बैजू बावरा’ अस या चित्रपटाचं नाव असणार आहे.

पिंकविलानं दिलेल्या वृत्तानुसार, भन्साळी सध्या या नव्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच भन्साळींना दीपिकाला या भूमिकेसाठी निवडायचं होतं. ‘रुपमती’ (Roopmati) ही भूमिका दीपिका साकारणार आहे.

दीपिका आणि भन्साळी यांनी या चित्रपटासाठी अनेकदा चर्चा तसंच भेटीही घेतल्या आहेत. अजून पेपरवर्क बाकी असलं, तरीही दोघांनीही चित्रपटासाठी सहमती दर्शवली आहे. लवकरच चित्रपटाच्या इतर कामकाजालाही सुरूवात होणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट पुढील वर्षी मे ते जूनच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९५२ चा चित्रपट ‘बैजू बावरा’चं हे नवं रुप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दीपिका व्यतिरिक्त अन्य भूमिकांविषयी अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. दीपिकानं याआधी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारखे हीट चित्रपट भन्साळी यांच्यासोबत केले आहेत.हेही वाचा

कोरोनातून बरी होऊन बंगळुरुहून मुंबईला परतली दीपिका

'The Family Man 2'चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा