Advertisement

'The Family Man 2'चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजचा ट्रेलर बुधवारी रिलीज करण्यात आला.

'The Family Man 2'चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजचा ट्रेलर बुधवारी रिलीज करण्यात आला. याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या ४ जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'फॅमिली मॅन' ऊर्फ श्रीकांत तिवारी या सीझनमध्‍ये नवीन, शक्तिशाली आणि क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीनं राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सीरिजच्‍या ९ भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन आणि जागतिक दर्जाचा गुप्‍तहेर अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसेल.

ट्रेलरबद्दल बोलताना अमेझॉन प्राइम व्हिडिओच्‍या इंडिया ओरिजिनल्‍सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्‍हणाल्या, ''आमची पात्रं घराघरांमध्‍ये लोकप्रिय बनत आहेत, यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही. वैशिष्‍ट्यपूर्ण फॅमिली मॅन श्रीकांत तिवारीला मिळालेले प्रेम आणि प्रशंसा उत्तम, वास्‍तववादी कथा सर्व मर्यादांना मोडून काढण्‍याबाबत असलेल्‍या आमच्‍या विश्‍वासाला अधिक दृढ करतात. 'द फॅमिली मॅन'चा नवीन सीझन अधिक रोमांचक, अधिक जटिल आणि अधिक ऍक्शननं भरलेला आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, प्रेक्षक श्रीकांत आणि त्‍याच्‍या प्रतिस्‍पर्धीमधील आमना-सामना पाहण्‍यासाठी खूपच उत्‍सुक असतील.''

निर्माते राज व डीके म्‍हणाले, ''निर्माते म्‍हणून आम्‍ही आज 'द फॅमिली मॅन'च्या बहुप्रतिक्षित सीझनचा ट्रेलर शेअर करण्‍यासाठी दीर्घकाळापासून वाट पाहत आलो आहोत. आम्‍ही खात्री देतो की, हा सीझन यंदाच्‍या उन्‍हाळ्याच्‍या शेवटपर्यंत सादर होईल. आम्‍ही आमचे वचन नेहमीच पाळले आहे, ज्‍याचा आम्‍हाला आनंद होत आहे. हा प्रतिक्षा काळ अखेर ४ जून रोजी समाप्‍त होईल. श्रीकांत तिवारी थरारक पटकथेसह परतत आहे आणि 'नवीन चेह-याच्‍या रूपात धोका येत आहे' – सामंथा अक्किनेनी, जिने उत्तम कामगिरी बजावली आहे. सोबतच प्रतिभावान कलाकार देखील आहेत.''

‘द फॅमिली मॅन २’ ही सीरिज यापूर्वी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणार होती. पण 'तांडव' या वेब सीरिजमुळे उद्भवलेल्या वादामुळे याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

या वेब सीरिजच्या माध्यमातून दक्षिणेची सुपरस्‍टार सामंथा अक्किनेनीचे डिजिटल पदार्पण होत आहे. मनोज बाजपेयी, प्रियामणी, शरिब हाश्‍मी, सीमा बिस्‍वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्‍वंतरी, शाहब अली, वेदांत सिन्‍हा आणि महक ठाकूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका यात आहेत.हेही वाचा

विद्या बालन स्टारर 'शेरनी' हा सिनेमा पुढील महिन्यात होणार प्रदर्शित

कोरोनाच्या संकटकाळात सरकार कुठे न कुठे कमी पडले : अनुपम खेर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा