Advertisement

प्रख्यात बॉलिवूड गायक केके यांचं निधन

कोलकाता येथील नझरूल मंच येथे एका कॉलेजच्या कार्यक्रमात ते हजर होते.

प्रख्यात बॉलिवूड गायक केके यांचं निधन
SHARES

प्रख्यात बॉलीवूड गायक केके (कृष्णकुमार कुन्नाथ) यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

केके हे कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. मात्र, या कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

केके यांच्या शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट होणार आहे.

केके यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणती होत असे. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत.

९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या यारो या गाण्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. केके यांनी रोमॅण्टिक गाण्यांसह पार्टी साँगपर्यंतची सर्व गाणी गायली आहेत.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा