Advertisement

सायना नेहवालनंतर 'या' बॅडमिंटनपटूवर बनणार बायोपिक!


सायना नेहवालनंतर 'या' बॅडमिंटनपटूवर बनणार बायोपिक!
SHARES

अभिनेता आणि क्रिडा प्रेमी यांचे बायोपिक बनवणं हे काही आता नवीन नाही. धोनी, सचिन तेंडुलकर, मेरी कोम, मिल्खा सिंह यांच्या आयुष्यावर आधारीत कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. त्यामुळे बायोपिकची एक लाटच बॉलिवूडमध्ये पाहायला मिळाली. आता यात आणखी एका बायोपिकची भर पडली आहे. सायना नेहवालनंतर आता आणखीन एका बॅडमिंटन खेळाडूवर बायोपिक बनवण्यात येणार आहे. पुल्लेला गोपीचंद यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, गोपीचंद यांची भूमिका कोणता अभिनेता करणार आहे? याबद्दल मात्र अजून कुठलीच घोषणा करण्यात आलेली नाही.


पुल्लेला गोपीचंद यांच्या वाढदिवशी घोषणा

फॉक्स स्टार स्टुडिओकडून ही घोषणा करण्यात आली आहे. पुल्लेला गोपीचंद यांच्या वाढदिवशीच फॉक्स स्टुडिओकडून ही घोषणा करण्यात आली आहे. हिंदी आणि तेलगु भाषेमध्ये हा चित्रपट बनवण्यात येणार आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सरू असून 2018 मध्ये शुटिंगला सुरुवात होईल.

गोपीचंद यांचा जन्म 1973 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता. पण नंतर त्यांनी बॅडमिंटनमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2001 मध्ये ऑल इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली होती. 2003 मध्ये त्यांनी निवृत्ती स्विकारली आणि हैदराबादमध्ये पुल्लेला गोपीचंद अकादमीची स्थापना केली.

गोपीचंद यांनी सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, श्रीकांत, पी. कश्यप सारख्या बॅडमिंटनपटूंना तयार केलं आहे. गोपीचंद हे दुसरे बॅडमिंटनपटू आहेत, ज्यांच्यावर बायोपिक बनत आहे. सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये तिची भूमिका श्रद्धा कपूर करणार आहे. यासाठी श्रद्धा कपूर गोपीचंद यांच्याकडूनच बॅडमिंटनचे आवश्यक ते बारकावे शिकत आहे.



हेही वाचा

'पद्मावती', 'न्यूड' आणि राजकारण!

'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'चं फर्स्ट पोस्टर लाँच!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा