Advertisement

'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'चं फर्स्ट पोस्टर लाँच!


'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'चं फर्स्ट पोस्टर लाँच!
SHARES

'सैराट' चित्रपटाचा हिंदी रिमेक 'धडक'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत ट्वीटर अकांऊंटवरून 'धडक'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर हे दोन नवे चेहरे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.



'धडक'च्या फर्स्ट लूकमध्ये जान्हवी आणि ईशान दिसत आहेत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. पोस्टरवर 'धडक' या नावावर रक्ताचे शिंतोडे दाखवण्यात आले आहेत. ६ जुलै २൦१८ मध्ये 'धडक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सैराट'वर आधारीत कथानक असल्यानं प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी फार उत्सुकता आहे.



ईशान आणि जान्हवी या दोघांसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. दोघांकडूनही प्रचंड अपेक्षा आहेत. जान्हवी ही श्रीदेवीची मुलगी आहे. तर ईशान शाहीद कपूरचा भाऊ आहे. सेलिब्रिटी कुटुंबातून हे दोन्ही कलाकार असल्यानं त्यांच्यावर तेवढेच दडपणही आहे. हे दडपण ते कितपत झेलू शकतात, हे मात्र सिनेमा आल्यानंतरच कळेल!



हेही वाचा

'ओह मेरी मेहबूबा'चा रिमेक ऐकून तुमचे पाय थिरकतील


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा