'ओह मेरी मेहबूबा'चा रिमेक ऐकून तुमचे पाय थिरकतील


SHARE

नुकताच 'फुकरे रिटर्न्स' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरनंतर चित्रपटातील 'मेहबूबा' गाणे देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. 'मेहबूबा' हे गाणं १९९७ मध्ये आलेल्या 'ओह मेरी मेहबूबा' या गाण्याचा रिमेक आहे.'ओ मेरी मेहबूबा' या गाण्याला नव्या अंदाजात पुन्हा प्रेक्षकांच्या समोर आणलं गेलं आहे. रिचा चड्डा साकारत असलेल्या भोली पंजाबनला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर फुकरे बॉईजची धमाल, मस्ती या गाण्यात पाहायला मिळत आहे. पण त्यांना काय माहित की, भोली पंजाबन तुरुंगातून सुटली आहे. बदला घेण्यासाठी या फुकरे बॉईजचा शोध घेत आहे. जर फुकरे बॉईज तिच्या हाती लागले, तर त्यांचं काही खरं नाही. पण सध्या फुकरे बॉईज या गाण्यात धमाल करताना दिसत आहेत.   

१९९७ मध्ये आलेल्या 'ओह मेरी मेहबूबा' या गाण्याला मोहम्मद रफी यांचा आवाज देण्यात आला होता. त्यामुळे रिमेकमध्ये देखील 'ओह मेरी मेहबूबा' या कडव्याला मोहम्मद रफी यांचाच आवाज आहे. तर गाण्यातील इतर कडव्यांना नेहा कक्कड आणि यासर देसाई यांचा आवाज देण्यात आला आहे.

'फुकरे रिटर्न्स' हा चित्रपट फुकरेचा सिक्वेल आहे. २൦१३ मध्ये आलेला 'फुकरे' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे फुकरेचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याची घोषणाच निर्मात्यांनी केली होती. फरहान अख्तर आणि रितेश सिंधवानी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात रिचा चड्डा, पुलकित सम्राट, अली फडल आणि मनजोत सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.हेही वाचा

अक्षयच्या शोमध्ये कपिल शर्मा 'नॉट रिचेबल'


संबंधित विषय