अक्षयच्या शोमध्ये कपिल शर्मा 'नॉट रिचेबल'


SHARE

कॉमेडियन अॅक्टर कपिल शर्माचा शो बंद झाला असला, तरी त्याच्या मागची साडेसाती काही केल्या संपत नाही. आता हेच बघा ना, कपिल शर्मा शोमध्ये असताना देखील कधी वेळेत आला नाही. त्यामुळे कित्येकदा त्याच्या शोवर येणाऱ्या कलाकारांना वाट पाहावी लागायची. या वेळी सुद्धा कपिल शर्माच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. फरक फक्त एवढाच आहे, की या वेळी कपिल शर्मा दुसऱ्या एका शोमध्ये देखील वेळेत पोहोचला नाही. वेळेत तर सोडाच, पण तो शोलाच पोहोचला नाही.

कपिल शर्मा 'फिरंगी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. 'फिरंगी'च्याच प्रमोशनसाठी कपिल अक्षय कुमारच्या 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोसाठी शूट करणार होता. मात्र, तो वेळेवर सेटवर पोहोचलाच नाही. त्यामुळे त्याच्याशिवायच शूट करण्यात आलं.


काय झालं होतं?

मीडिया रिपोर्टनुसार, ११ वाजता शोच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. जवळपास १൦.३൦ वाजता सर्वजण सेटवर हजर होते. पण कपिलचा काहीच पत्ता नव्हता. सर्वजण त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याचा फोन देखील नॉट रिचेबल येत होता. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अखेर कपिलशिवाय शो शूट करण्यात आला. कपिलच्या टीमला देखील तो कुठे आहे हे माहीत नव्हतं. पण दुपारी २ वाजल्यानंतर त्यांच्याच टीममधल्या एका सदस्यानं त्याची प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं.

पण कपिल शर्माच्या बाबतीत हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही. यापूर्वी देखील कपिलनं अनेक कलाकरांना ताटकळत ठेवलं आहे. 'कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा'च्या सेटवर देखील कपिल वेळेत यायचा नाही, अशी तक्रार अनेकांनी केली आहे. शाहरुख खान, विद्या बालन आणि अजय देवगन या कलाकारांना देखील शोवरून शूट न करताच परत जावं लागलं होतं.हेही वाचा

इफ्फीचे 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर'...अमिताभ बच्चन!


संबंधित विषय