इफ्फीचे 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर'...अमिताभ बच्चन!


SHARE

हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया म्हणजेच 'इफ्फी'तर्फे त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व सूचना मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानात देखील त्यांनी हातभार लावला होता. त्यामुळेच स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांची ब्रॅण्ड अम्बेसेडर म्हणून निवडही करण्यात आली होती. सामाजिक कार्यात त्यांचा हातभार पाहता त्यांना 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्तारानं सन्मानित करण्यात येणार आहे.२൦ नोव्हेंबरपासून ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) सुरुवात होणार आहे. गोव्यामध्ये हा महोत्सव रंगणार आहे.हेही वाचा

'पद्मावती' प्रदर्शित होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही - दीपिका पादुकोण

ओळख पाहू हे कलाकार कोण आहेत?


संबंधित विषय
ताज्या बातम्या