Advertisement

अमिताभ बच्चन यांना पालिकेने का बजावली नोटीस? वाचा


अमिताभ बच्चन यांना पालिकेने का बजावली नोटीस? वाचा
SHARES

बॉलिवूडचे शहेनशहा अशी ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांच्यासह निर्माता राजकुमार हीराणी, पंकज बालाजी, संजय व्यास, हरीश खंडेलवाल, हरेश जगतानी यांना अनधिकृत बांधकामाप्रकणी पालिकेने नोटीस बजावली आहे. ही माहिती माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर पालिकेने या सर्वांना नोटीस बजावली आहे.


'ही' माहिती आरटीआयअंतर्गत उघड

अमिताभ यांच्या दिंडोशी येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची माहिती आरटीआयअंतर्गत उघडकीस आली. खरेतर यापूर्वी अमिताभ यांच्या आर्किटेक्टरने या बांधकामासाठी पालिकेकडे जानेवारी 2017 मध्ये परवानगी मागितली होती, पण हा प्रस्ताव पालिकेने नामंजूर केला होता. त्यानंतरही हे बांधकाम करण्यात आल्याची माहिती आरटीआयअंतर्गत उघडकीस आली आहे. त्यानंतर अमिताभ यांना पालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत नोटीस पाठवली आहे.


त्यामुळे यांना बजावली नोटीस

अमिताभ यांच्यासोबतच निर्माता राजकुमार हिराणी, पंकज बलानी, संजय व्यास, हरेश खंडेलवाल, हरेश जगतानी यांना देखील पालिकेने  नोटीस बजावली आहे. कारण या सर्वांनी हे बंगले ओबेरॉय रियालटीकडून खरेदी करत तेथे अनधिकृत बांधकामं केली. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आणली आहे. .

अमिताभ यांना त्यांच्या बंगल्याचा एक भाग रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेला द्यावा लागणार आहे. प्रतिक्षा बंगल्यापासून इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच ट्रॅफिक असते. मंजूर आराखड्यानुसार या रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे. पण मंजूर आराखड्यानुसार अमिताभ यांनी अतिरिक्त बांधकाम केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले. पालिकेने 7 डिसेंबर 2016 मध्येच अमिताभ यांना नोटीस बजावली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा