Advertisement

कपिल शर्माला आत्महत्या करावीशी वाटत होती!


कपिल शर्माला आत्महत्या करावीशी वाटत होती!
SHARES

कपिल शर्मा आणि वादविवाद हे समीकरण तसं जुनंच. सहकलाकार सुनील ग्रोवरशी झालेलं भांडण असो वा कपिलचं सेटवर उशिरा येण्यापासून ते कलाकारांना ताटकळत ठेवणं असो. यामुळे तो चांगलाच चर्चेत आला. मात्र, यासोबतच या सर्व गोष्टींचा त्याच्या आयुष्यावर देखील तितकाच परिणाम झाला. याची कबुली खुद्द कपिल शर्मानं दिली आहे. 'फिरंगी' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात कपिलनं या सर्व विषयांवर भाष्य केलं आहे.



'माझ्याबद्दल होत असलेल्या चर्चांमुळे मला मानसिक त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे मला नैराश्य येऊ लागलं. याचाच परिणाम म्हणून मी दारू पिऊ लागलो. हे सर्व असह्य झाल्यानंतर एक वेळ अशीही आली की, मला आत्महत्या करावीशी वाटली. त्यात शोचा टीआरपी घसरू लागला. यामुळे मी आणखीन तणावाखाली गेलो,' असे कपिल म्हणाला.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला की, 'माझ्या मित्रांनी मला यातून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या एका मित्रानं मला त्याच्या समुद्राजवळील घरात राहण्याचा सल्ला दिला. त्याच्या घरातून मी जेव्हा समुद्राकडे पाहायचो, तेव्हा मला त्यात उडी मारून आत्महत्या करावी असं वाटायचं. या सर्वाचा परिणाम माझ्या खाजगी आणि व्यवसायिक आयुष्यावर देखील होत होता. मी कुणाशी जास्त बोलायचो नाही. सेटवर देखील माझं कामात लक्ष लागायचं नाही. त्यामुळे शोचा टीआरपी घसरत होता.'


फक्त एवढंच नाही, तर एका मुलाखतीत सुनील ग्रोवर आणि चंदनसोबत झालेल्या वादावर देखील कपिलनं भाष्य केलं आहे. 'ऑस्ट्रेलियाला गेल्यापासून माझा मूड खराब होता. माझ्यावर शोची पूर्ण जबाबदारी होती. त्याच दरम्यान माझ्या एका आर्टिस्टचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मी चिंताग्रस्त होतो. माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. त्यात शोच्या आधी एका महिलेने माझ्याजवळ येऊन चंदनबद्दल तक्रार केली. त्यामुळे मी चंदनवर ओरडलो. मी चंदनची बाजू ऐकून घ्यायला हवी होती. मी त्याची बाजू न ऐकताच त्याच्यावर ओरडलो. यासाठी मला चंदनची माफी मागायची होती. पण ऑस्ट्रेलिया ट्रीपनंतर चंदन काही दिवसांसाठी गायबच झाला.'

सुनील ग्रोवर विषयी बोलताना कपिल म्हणाला की, 'मी सुनीलला नऊ वर्षांपासून ओळखतो. पाच वर्षांपासून आम्ही एकत्र काम केलं आहे. मला त्याच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही. मी सुनीलच्या जागी असतो आणि सुनील माझ्या जागी असता, तर मी नक्की त्याला विचारलं असतं की, तू असा का वागत आहेस? तुला काय प्रॉब्लेम आहे? पण सुनीलनं कधीच माझ्या समस्यांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही.'

सध्या कपिल शर्मा त्याच्या आगामी 'फिरंगी' चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या कपिल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दोन दिवसांपूर्वी फिरंगी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर नुकतेच या चित्रपटाचे एक गाणे देखील प्रदर्शित झाले. ओय फिरंगी असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. 





हेही वाचा

तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता, मोदींची नाही?

रजनीकांतच्या '2.0'चं नवीन पोस्टर पाहिलंत का?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा