Advertisement

तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता, मोदींची नाही?


तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता, मोदींची नाही?
SHARES

स्टार प्लस वाहिनीवरील 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' हा कॉमेडी शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करण्यात प्रसिद्ध असलेल्या कॉमेडियन श्याम रंगीलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या सोशल मंचावर रंगीलानं मोदींची हुबेहूब नक्कल केली होती.



दरम्यान, अलका सक्सेना यांनी प्रॉडक्शन कंपनीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

'द वायर' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत श्याम रंगीलानं आरोप केला आहे की, 'मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करतानाचा हा भाग चित्रीत झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर मला कार्यक्रमाच्या प्रॉडक्शन टीमकडून फोन आला. त्यांनी मला पुन्हा चित्रीकरणासाठी बोलावलं. पण नंतर वाहिनीनं मोदींची नक्कल करतानाचा भाग प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला. 'तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता मात्र मोदींची नाही' असं वाहिनीकडून सांगण्यात आलं. राहुल गांधींची नक्कल करण्यास मी तयार झालो. पण नंतर त्यांनी तो एपिसोड चित्रीत करण्यास देखील नकार दिला.'



'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कार्यक्रमासाठी स्पर्धकांनी ऑडिशन दिली होती. ऑडिशनसाठी श्याम रंगीलाला वाहिनीकडूनच कॉल आला होता. नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांची हुबेहूब नक्कल करतानाचे श्यामचे व्हिडिओ पाहूनच त्याला कार्यक्रमात सहभागी होण्यास निमंत्रण दिले होते. पण नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल केल्यास शोला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. याच भितीनं श्याम रंगीलाची हकालपट्टी केली अशी चर्चा सध्या रंगली आहे.



हेही वाचा

मल्लिका दुआ का भडकली अक्षय कुमारवर?

'पद्मावती'साठी वापरलं 400 किलो सोनं!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा