'कपिल शर्मा शो'चा बाजार उठला...


'कपिल शर्मा शो'चा बाजार उठला...
SHARES

तुम्ही 'द कपिल शर्मा शो'चे चाहते असाल, तर कदाचित ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसू शकेल. कारणही तसंच आहे. कपिलच्या 'लहरी' वागण्याला कंटाळून अखेर सोनी टीव्हीने 'द कपिल शर्मा शो' गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. कपिलच्या शोची जागा आता 'ड्रामा कंपनी' घेईल.

'इंडियन विकी मीडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार शुटींगला वेळेवर न पोहोचणं, सेलिब्रिटी गेस्टला सेटवर वाट पाहायला लावणं, ब्रॉडकास्टर्सशी योग्य ताळमेळ न साधणं चॅनलला पसंत पडलेलं नाहीय. त्यामुळं अखेर सोनी टीव्हीनं 'द कपिल शर्मा शो' बंद करण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वीच अजय देवगण 'बादशाहो' सिनेमाच्या टीमसोबत कपिल शर्माच्या सेटवर पोहोचला होता. तेथे त्यांना कपिलची वाट पाहावी लागली, अखेर कपिल वेळेत न आल्यानं शुटींग रद्द करावं लागलं.

कपिलच्या उद्धट वागण्याला कंटाळून सुनील ग्रोव्हर, अली असगर, चंदन प्रभाकर आणि सुगंधा मिश्रा आधीच त्याचा शो सोडून गेले होते. यापैकी अली असगर आणि सुगंधा मिश्रा सध्या कृष्णा अभिषेकच्या 'ड्रामा कंपनी'त काम करताहेत.

'ड्रामा कंपनी' कपिल शर्माच्या शोच्या वेळेत प्रसारीत होणार असून 'ड्रामा कंपनी'च्या जागेवर 'सुपर डान्सर' हा शो लवकरच सुरू होईल.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय