Advertisement

अक्षयच्या 'गोल्ड'चा टीझर रिलीज


अक्षयच्या 'गोल्ड'चा टीझर रिलीज
SHARES

खिलाडी अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'गोल्ड'चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. या टीझरमध्ये अक्षय बंगाली व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो. ज्याचे हॉकी आणि देशावर प्रेम असते. १९४६ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीपटूंनी कशा प्रकारे सुवर्णपदक मिळवलं, यावरच आधारित या चित्रपटाची कथा आहे.


सिनेमात यांची भूमिका 

गोल्ड या सिनेमात मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित सध, विनीत सिंग आणि सनी कौशल यांच्याही भूमिका आहेत. गोल्ड या सिनेमाचं दिग्दर्शन रीमा कागतीने केलं आहे. याआधी रीमाने 'दिल धडकने दो', 'तलाश' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटांची पटकथा लिहीली होती. तर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एनटर्टेन्मेंटची निर्मिती केली आहे.

गोल्ड या सिनेमाचा टीझर अक्षयने सोशल मीडियावर शेअक केला आहे. या सिनेमाचा टीझर शेअर करताना अक्षयने सुंदर कॅप्शनही दिलं आहे. अक्षय लिहितो, 'अभी तक इंडिया चुप था, अब हम लोग बोलेंगे और दुनिया सुनेगी’.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा