Advertisement

आता हिंदीत झिंग झिंग झिंगाट...


आता हिंदीत झिंग झिंग झिंगाट...
SHARES

कलाकारांचा दमदार अभिनय, दिग्दर्शन कौशल्य यामुळे सैराट या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल. या चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट या गाण्याने तर प्रेक्षकांना आगदी वेड लावलं. मराठी सैराटने भरभरून प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीमध्ये बनवल्या जाणाऱ्या या चित्रपटाचं नाव धडक असं आहे. या हिंदी चित्रपटाचं नावं जरी वेगळं असलं तरी सैराटमधील झिंगाट हे गाजलेलं गाणं तसचं ठेवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता हिंदीत झिंग झिंग झिंगाट करता येणार आहे.  


झिंगाट संगीत

या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केलं असून करण जोहर निर्माता आहे. मराठी चित्रपट सैराटमधील 'झिंगाट' हे गाजलेलं गाण हिंदी रिमेकमध्येही कायम ठेवण्याचा निर्णय निर्माता करण जोहरने घेतला आहे. या गाण्याच्या शब्दांमध्ये एखादवेळेस बदल असेल. मात्र ठेका, संगीत मात्र झिंगाटचं असेल. धर्मा प्रोडक्शनने केलेल्या ट्वीटनुसार या गाण्याचं शुटिंग सुरू झालं असून या गाण्याचं दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी फराह खान करत आहे.


फराह खानची कोरिओग्राफी म्हणजे पुन्हा एकदा हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार हे नक्की. कारण याआधी फराह खानने कोरिओग्राफी केलेली अनेक गाणी प्रसिद्ध आहेत, ती म्हणजे गाण्यातील सोप्या आणि सहज करता येणाऱ्या डान्समुळे. आता धडक या चित्रपटात देखील झिंगाटची मजा प्रेक्षकांना लुटता येईल यात शंका नाही.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा