Advertisement

फरहान अख्तर स्टारर 'तुफान'चा ट्रेलर प्रदर्शित

'तुफान'च्या धडाकेबाज ट्रेलरमध्ये स्थानिक गुंडाच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडते. हा अज्जू भाई व्यावसायिक बॉक्सर अझीझ अली बनतो.

फरहान अख्तर स्टारर 'तुफान'चा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

अमेझॉन प्राईम व्हिडिओनं 'तुफान’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज झळकणार आहेत. तर राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.

'तुफान'च्या धडाकेबाज ट्रेलरमध्ये स्थानिक गुंडाच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडते. हा अज्जू भाई व्यावसायिक बॉक्सर अझीझ अली बनतो.


दबावाच्या परिस्थितीत डोंगरीच्या रस्त्यावर एका अनाथ मुलाचा जन्म होतो. मोठेपणी हा स्थानिक गुंड बनतो. त्याची ओळख हुशार आणि प्रेमळ तरुणी, अनन्यासोबत होते आणि त्याचे जीवनच बदलून जाते. ती त्याला योग्य मार्ग दाखवते.

प्रेम आणि मार्गदर्शनाच्या जोरावर हा तरुण आपले नशीब आजमावतो. एक जागतिक किर्तीचा बॉक्सर म्हणून त्याला लौकिक मिळतं. ही एक प्रेरणादायी कथा आहे. गरीबी आणि मागास परिस्थितीत पिचलेला नायक देशाचा आदर्श होतो. तो वाम मार्ग सोडतो आणि योग्य दिशा अंगीकारतो. तुफानची कथा मुंबईत आकार घेते.

अभिनेता फरहान अख्तर म्हणाला की, “मी तुफानच्या खऱ्या अर्थानं प्रेमात आहे. एखादी व्यक्ती शरीरानं कितीही बळकट असली तरीही बॉक्सर असणं, हे काही येरागबाळ्याचं काम नव्हे. या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत शिरताना मला ८ ते ९ महिने अविश्रांत कष्ट घ्यावे लागले. बॉक्सिंग हा खेळ शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुमची कसोटी पाहणारा खेळ आहे. आम्ही घेतलेली मेहनत स्क्रीनवर पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे. आम्ही हा सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडीओसोबत सुमारे २४० देश आणि प्रदेशात घेऊन जात असल्याचा मला आनंद वाटतो.”

अभिनेता परेश रावल म्हणाले, “एखादे प्रोजेक्ट नवीन असताना फारच आव्हानात्मक वाटते. एका बॉक्सिंग प्रशिक्षकाची भूमिका निभावणं फारच आव्हानात्मक होतं. एक अभिनेता म्हणून मला प्रोत्साहन मिळालं. तुफान प्रत्येक टप्प्यावर आव्हान देणारा आहे. एखाद्यानं हार पत्करू नये हे सांगणारा आहे. हा एक परिपूर्ण मनोरंजनपट आहे. त्यात थरार आहे, विचार प्रवर्तक आहे आणि प्रेरणा देणारा ठरेल. राकेशनं मास्टरपीस निर्माण केला आणि फरहान त्याचा ‘ए-गेम’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. या सिनेमासाठी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतो. आम्हाला तो तयार करताना मजा आली. तेव्हा प्रेक्षकांना हा सिनेमा निश्चित आवडेल अशी खात्री वाटते.”

अभिनेत्री मृणाल ठाकूर म्हणाली की, “राकेश ओमप्रकाश मेहरा, परेश रावल आणि फरहान अख्तर यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणं. सात वर्षांपूर्वी राकेश यांनी फेसबुक मेसेज पाठवून माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, हे मला आठवतं. आज ते प्रत्यक्षात घडतं आहे. अशा रोमांचक सिनेमाचा भाग असल्यानं चंद्रावर पोहोचल्याचा भास होतो. माझ्या कारकीर्दीच्या या टप्प्यावर इतक्या उत्तम कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. मी याहून उत्तम किंवा प्रेरणादायी कलाकारांचा विचारच करू शकत नाही. ”

एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजीत अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणारा तुफान हा पहिलाच चित्रपट आहे. १६ जुलै २०२१ पासून भारतासह २४०  देश आणि प्रदेशातील प्राईम मेंबरकरिता तो उपलब्ध असेल.



हेही वाचा

जालियनवाला हत्याकांडवर आधारीत चित्रपटाची घोषणा, करण जोहरची निर्मिती

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहरा आणि त्याच्या कुटुंबीयांविरूद्ध गुन्हा दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा