Advertisement

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहरा आणि त्याच्या कुटुंबीयांविरूद्ध गुन्हा दाखल

करणनं परवानगी न घेता आपल्या बँक खात्यामधून एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढल्याचा आरोपही निशानं केला आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहरा आणि त्याच्या कुटुंबीयांविरूद्ध गुन्हा दाखल
SHARES

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहराच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्याची पत्नी निशा रावल हिच्या तक्रारीनंतर करण आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

करणची पत्नी निशा हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. करणसह त्याच्या कुटुंबातील सदस्य अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा यांची देखील नावं तक्रार अर्जामध्ये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांच्या एफआयरमध्ये करणनं निशाला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर करणच्या कुटुंबातील अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा यांनी देखील मारहाण केल्याचा आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

करणनं परवानगी न घेता आपल्या बँक खात्यामधून एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढल्याचा आरोपही निशानं केला आहे. करणविरोधात पुरावे मिळाल्यास त्याला अटक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. निशानं ३१ मे रोजी करणच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देखील होती.

३१ मे रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात निशाच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी करणला अटक केली होती. मात्र काही तासांनंतरच त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. १ जून रोजी निशानं पत्रकार परिषद घेऊन आपली आपबीती कथन केली होती.

तिनं करणवर मारहाण आणि डोके फोडल्याचा आरोप केला होता. यासह करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासा तिनं यावेळी केला होता. निशाच्या म्हणण्यानुसार, ती वारंवार करणला माफ करत राहिली. पण जेव्हा तिला मारहाण झाली तेव्हा मुलगा काविशसाठी तिला मीडियासमोर यावं लागलं.

निशा रावल हिने करणविरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. करणवरील आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा नीशानं केला. पती करण मेहराच्या फोनवर काही मेसेज सापडल्यानंतर त्याच्या अफेअर बद्दल लक्षात आल्याचे ती म्हणाली होती.

निशानं सांगितलं होतं की, 'करणचे दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध आहेत, याबद्दल मला काहीच माहित नव्हते. मात्र नंतर जेव्हा मला याबद्दल समजले, तेव्हा मी करणला याबद्दल विचारणा केली आणि त्यानंही त्याच्या आयुष्यात एक मुलगी असल्याचं स्वीकारलं.' इतकंच नाही तर त्या मुलीशी शारीरिक संबंध असल्याची कबुली करणनं दिल्याचं निशानं सांगितलं होतं.

दरम्यान त्याआधी करणनं त्याची बाजू मांडताना निशा बायपोलर आणि आक्रमक आहे. तसंच ती शिवीगाळ करते असा दावा केला होता. तो म्हणाला होता, 'निशाच्या म्हणण्याप्रमाणे मी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यासाठी तयार होतो. मी माझ्या आई-बाबांशी फोनवर बोलण्यासाठी खोलीत गेलो. तेव्हा निशा देखील तिथे आली आणि तिनं माझ्यासह माझे आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

ती जोरजोरात ओरडत होती. ती माझ्यावर थुंकली. मी जेव्हा तिला बाहेर जाण्यास सांगितलं तेव्हा ती मला धमकी देऊ लागली. मी इथून निघून गेले तर काय करते ते पाहाच अशी धमकी तिनं मला दिली होती. त्यानंतर तिनं स्वतःचे डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली आणि नंतर हे सर्व मी केल्याचं सर्वांना सांगितलं.'हेही वाचा

अभिनेत्री शबाना आझमींना दारूची होम डिलिव्हरी पडली महागात

बिग बींकडून शीव रुग्णालयाला १.७५ कोटींची मदत

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा