Advertisement

बिग बींकडून शीव रुग्णालयाला १.७५ कोटींची मदत

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या आणइ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं बच्चन यांचे आभार मानले आहेत.

बिग बींकडून शीव रुग्णालयाला १.७५ कोटींची मदत
SHARES

शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयास सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास – 1’ प्रकारातील 2 अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहेत.

त्याचबरोबर मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर, इन्फ्युजन पंप इत्यादी सुमारे रुपये पावणे दोन कोटी किमतीची यंत्र सामुग्री देणगी स्वरुपात त्यांनी रुग्णालयाला दिली.

या अनुषंगानं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या आणइ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं बच्चन यांचे आभार मानले आहेत. सदर दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे शीव रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात काही दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आले आहेत.

या दोन्ही अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’द्वारे गेल्या काही दिवसात सुमारे ३० गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती शीव रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.

बच्चन यांच्याद्वारे देणगी स्वरुपात प्राप्त झालेले दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे संगणकीय प्रणाली आधारित अत्याधुनिक आणि अद्ययावत ‘व्हेंटिलेटर’ आहेत. या यंत्रांद्वारे ज्या रुग्णांची प्राणवायू (ऑक्सिजन) पातळी खालावलेली आहे, अथवा ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी या ‘व्हेंटिलेटर’चा उपयोग केला जात आहे.

अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’चे वैशिष्ट्ये

१) गरजू रुग्णांना १०० टक्क्यांपर्यंत प्राणवायू (ऑक्सिजन) देण्याची सुविधा यामध्ये आहे.

२) प्राणवायू दाब आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची सुविधा सदर ‘व्हेंटिलेटर’मध्ये आहे.

३) नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा देखील यात आहे.

४) ‘नॉन इन्व्हेझिव्ह मास्क’ पद्धतीनं ऑक्सिजन देण्याची सुविधा या ‘व्हेंटिलेटर’मध्ये आहे.



हेही वाचा

१९व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी कंदीलची निवड

मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या 'या' चित्रपटात झळकरणार कार्तिक आर्यन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा