Advertisement

मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या 'या' चित्रपटात झळकणार कार्तिक आर्यन

चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता आपल्या सर्वांचा लाडका दिग्दर्शक समीर विध्वंस हा करणार आहे.

मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या 'या' चित्रपटात झळकणार कार्तिक आर्यन
SHARES

बॉलिवूडचा (Bollywood) हँडसम हंक म्हणून अभिनेता कार्तिक आर्यनला(Kartik Aryan) ओळखलं जातं. कार्तिक आपल्या क्युट लुकमुळे तरुणींच्या गळयातील ताईत बनला आहे. त्यामुळे कार्तिकच्या चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट पाहात असतात.

नुकताच कार्तिक सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कार्तिक लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. कार्तिकनं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ (Video) शेयर करत ही माहिती दिली आहे.

नुकताच कार्तिक आर्यननं आपल्या इन्स्टाग्रामवर एक छोटासा टीझर शेयर करत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसंच कार्तिकनं कॅप्शन देत हा चित्रपट आपल्या मनाच्या खुपचं जवळ असल्याचं म्हटलं आहे.

‘सत्यनारायण की कथा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. साजिद नाडियादवाला यांनी नमो पिक्चर्सच्या सोबतीनं हा प्रोमो रिलीज केला आहे. साजिद नाडीयादवालाच या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कार्तिकच्या या घोषणेनंतर चाहत्यांना खुपचं आनंद झाला आहे.महेश मांजरेकर लवकरच घेऊन येत आहेत बिग बॉस सिजन ३


‘सत्यनारायण की कथा’ हा अभिनेता कार्तिक आर्यन याची मुख्य भूमिका असलेला आणि साजिद नाडीयादवाला यांची निर्मिती असलेला चित्रपट आहे. मात्र खास बाब म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता आपल्या सर्वांचा लाडका दिग्दर्शक समीर विध्वंस हा करणार आहे. हा चित्रपट एका लव्हस्टोरीवर आधारित असणार आहे.

समीरनं देखील नुकतीच ट्विटरद्वारे या चित्रपटाची घोषणा केली आहे. एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, असे समीरने ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसंच समीरनं चित्रपटाचं एक मोशन पोस्टर शेअर केलं आहे.

समीरनं यापूर्वी ‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’ आणि ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटांना मिळाला होता. आता लवकरच समीरची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘समांतर २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते.हेही वाचा

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील नट्टू काकांना कॅन्सर

‘द फॅमिली मॅन 2’ जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज, ‘फ्रेंड्स’लाही टाकलं मागे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा