Advertisement

‘द फॅमिली मॅन 2’ जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज, ‘फ्रेंड्स’लाही टाकलं मागे

‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीझनलाही पहिल्या सीझनप्रमाणेच चाहत्यांचे तितकेच प्रेम मिळाले आहे.

SHARES

अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), शरिब हाश्मी (Sharib Hashmi)आणि अभिनेत्री समांथा अक्किनेनी (Samantha) स्टारर वेबसीरीज द फॅमिली मॅन २ (The Family Man 2) नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीझनलाही पहिल्या सीझनप्रमाणेच चाहत्यांचे तितकेच प्रेम मिळाले आहे.

अभिनेता मनोज बाजपेयीची ही सीरीज आयएमडीबीवरील जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज बनली आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ जगभरातील लोकप्रिय सीरीजमध्ये चौथ्या क्रमांकाची सीरीज बनली आहे.

यासह, या सीरीजला आयएमडीबीवर १० पैकी ८.८ स्टार देण्यात आले आहेत. या रेटिंगसह, ‘द फॅमिली मॅन 2’ जगातील सर्वोत्तम ५ वेब सीरीजच्या यादीत सामील झाली आहे.

या अनोख्या विक्रमामुळे या सीरीजनं बर्‍याच लोकप्रिय सीरीजना मागे टाकलं आहे. आता ‘द फॅमिली मॅन 2’ नं ‘फ्रेंड्स’, ‘ग्रेज अनोटोमी’ यासारख्या मालिकांना मागे टाकलं आहे. तर ‘लोकी’, ‘स्वीट टूथ’ आणि ‘मियर ऑफ ईस्टटाउन’ अद्याप फॅमिली मॅनपेक्षाही पुढे आहेत.

अभिनेता मनोज बायपेजी यांनी स्वत: चाहत्यांना या खास विक्रमाची माहिती दिली आहे. या अभिनेत्यानं अलीकडेच ट्विटद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्यानं लिहिलं की, द फॅमिली मॅन 2 हा जगातील चौथा सर्वाधिक लोकप्रिय शो बनला आहे.

मालिकेचा पहिला सीझनदेखील चाहत्यांनी खूप पसंत केला होता. या वेळी सीरीजची कहाणी नवीन ट्विस्टसह सादर केली गेली आहे. ज्यामध्ये आता श्रीकांत तिवारी एका खासगी कंपनीत नोकरी करताना दाखवले आहेत. या सीरीजमध्ये यावेळी फॅमिली ड्रामा देखील पाहायला मिळेल.

मीडिया रिपोर्टनुसार शोच्या तिसर्‍या सीझनची तयारी सुरू झाली आहे. याची छोटीशी झलक सिजन २ च्या शेवटी पाहायला मिळेल. मात्र, निर्मात्यांनी अद्याप तिसर्‍या सीझनची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा