शाहरूखच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'डॉन 3'ची घोषणा!


SHARE

डॉन को पकडना, मुश्किल ही नहीं नामुमकीन है! हा डायलॉग तर तुम्हाला नक्कीच लक्षात असेल. आता हा डायलॉग तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. कारण 'डॉन' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शाहरूखच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच खुशखबरच आहे.

निर्माता रितेश सिधवानी 'डॉन 3' बनवणार आहेत. पण यासाठी त्यांना एखादी चांगली स्क्रिप्ट हवी आहे. 'डॉन 3'ची चांगली स्क्रिप्ट हाती लागल्यास चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल.

2006 मध्ये 'डॉन' आणि 2011 मध्ये 'डॉन 2' प्रदर्शित झाले होते. शाहरुख खाननं चित्रपटात डॉनची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील डायलॉग्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. चित्रपटातील डायलॉग्स आजही प्रेक्षकांना तोंडपाठ असावेत. रितेशचं म्हणणं आहे की, डॉन 3 चित्रपट बनवण्यास मी खूप उत्सुक आहे. पण आमच्याकडे चांगली स्क्रिप्ट नाही. चांगली स्क्रिप्ट हाती आली की डॉन 3 चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. 

'फुकरे रिटर्न्स' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रितेशनं डॉन 3 संदर्भात घोषणा केली. सध्या रितेश 'फुकरे रिटर्न्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 15 डिसेंबरला 'फुकरे रिटर्न्स' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बहुधा या चित्रपटानंतर रितेश 'डॉन 3' चित्रपटाच्या स्क्रिप्टवर लक्ष केंद्रीत करेल. तोपर्यंत तरी प्रेक्षकांना 'डॉन 3' चित्रपटाची प्रतीक्षाच करावी लागेल.


संबंधित विषय
ताज्या बातम्या