Advertisement

कपिल शर्माच्या 'फिरंगी'चा पोस्टर रिलीझ


कपिल शर्माच्या 'फिरंगी'चा पोस्टर रिलीझ
SHARES

कॉमेडिअन कपिल शर्माने पुन्हा एकदा नव्या जोमाने त्यांच्या कामाची सुरुवात केली आहे. आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कपिल तयारीला लागला आहे. कपिलच्या फिरंगी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. फक्त पोस्टरच नाही तर त्यासोबत चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कपिल शर्मांच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच गोड बातमी आहे.



कपिल शर्माने फिरंगी चित्रपटाचा पोस्टर आपल्या ट्विटर हँडलवरही पोस्ट केला आहे. कपिलसोबत इशिता दत्ताने देखील ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. पोस्टरवर मोठ्या अक्षरांमध्ये फिरंगी असे लिहले आहे. शिवाय पोस्टरवर ‘युके’च्या झेंड्याची झलक दिसत आहे. फिरंगी चित्रपटात कपिल शर्मासोबत इशिता दत्ता आणि मोनिका गिल झळकणार आहेत.



कपिल शर्माचा हा दुसरा चित्रपट आहे. पहिल्या चित्रपटात कपिल चार अभिनेत्रींसोबत रोमांस करताना दिसला होता. कपिलचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर जादू करण्यास असफल राहिला होता. त्यामुळे फिरंगी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. पण कपिल शर्माला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा