Advertisement

थिएटरमध्ये जाऊन बघा ‘उरी’ सिनेमाचा मोफत शो, ‘कारगिल विजय दिनी’ सरकारचं गिफ्ट


थिएटरमध्ये जाऊन बघा ‘उरी’ सिनेमाचा मोफत शो, ‘कारगिल विजय दिनी’ सरकारचं गिफ्ट
SHARES

देशभरात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. राज्य सरकारने यंदा हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं आहे. त्यानुसार विजय दिनाचं औचित्य साधून राज्य सरकारतर्फे राज्यातील सुमारे ३०० सिनेमागृहात एकाचवेळी ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा बहुचर्चित सिनेमा मोफत दाखवण्यात येणार आहे. 

या युद्धपटाचा आनंद १८ ते २५ वयोगटातील सुमारे ९० हजारांहून अधिक महाविद्यालयीत तरूणांना घेता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील लेखी आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सह्याद्री अतिथीगृहावर काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर, सिनेमाचे निर्माते, यूएफओ या वितरण कंपनीचे प्रतिनिधी आणि सिंगल स्क्रीन थिएटरचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सकाळी १० वाजता सॅटेलाइट्वारे यूएफओमार्फत एकाचवेळी या सिनेमाचं प्रक्षेपण करण्यात येईल, असं म्हटलं जात आहे.हेही वाचा-

'बाबा'नं जमवली स्पृहा-अभिजीतची जोडी

विवाहपद्धतीवर ग्रामीण शैलीत टिपण्णी करणार 'बायको देता का बायको'Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा