Coronavirus cases in Maharashtra: 1082Mumbai: 642Pune: 130Navi Mumbai: 28Islampur Sangli: 26Kalyan-Dombivali: 25Ahmednagar: 25Thane: 24Nagpur: 19Pimpri Chinchwad: 17Aurangabad: 13Vasai-Virar: 10Latur: 8Buldhana: 7Satara: 6Panvel: 6Pune Gramin: 4Usmanabad: 4Yavatmal: 3Ratnagiri: 3Palghar: 3Mira Road-Bhaynder: 3Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Ulhasnagar: 1Gondia: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 64Total Discharged: 79BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

विवाहपद्धतीवर ग्रामीण शैलीत टिपण्णी करणार 'बायको देता का बायको'

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. अनेकांसाठी आनंदाचा तर काहींसाठी मात्र त्रासदायक ठरतो. अशाच लग्नाची कथा 'बायको देता का बायको' या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

विवाहपद्धतीवर ग्रामीण शैलीत टिपण्णी करणार 'बायको देता का बायको'
SHARE

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. अनेकांसाठी आनंदाचा तर काहींसाठी मात्र त्रासदायक ठरतो. अशाच लग्नाची कथा 'बायको देता का बायको' या चित्रपटात पहायला मिळणार आहे.


२३ ऑगस्टला प्रदर्शित

वाढतं शहरीकरण, शेतीची दुरावस्था, बेरोजगारी यांतून अनेक सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. ग्रामीण भागातही याचे परिणाम दिसू लागले आहेत. या साऱ्या प्रश्नांचा वेध विनोदी आणि मार्मिक पद्धतीनं घेणारा 'बायको देता का बायको' हा  मराठी चित्रपट २३ ऑगस्टला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा संगीत व ट्रेलर अनावरण सोहळा युवा संगीतकार जोडी चिनार- महेश यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. वाय डी फिल्मस् निर्मित 'बायको देता का बायको' या चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेश ठाणगे यांनी, तर निर्मिती धनंजय रामदास यमपुरे यांनी केली आहे.


गमतीशीर शैलीत

शेतीत उत्पन्न नाही, नोकरीची संधी नाही, वाढती महागाई आणि त्यात जोडीदारांबद्दलच्या अवास्तव अपेक्षा यांतून आजची तरुण पिढी त्रस्त आहे. ही स्थिती अनेक घरांतून दिसत असली तरी या सामाजिक प्रश्नाकडं फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. या सर्वांचा उहापोह या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय गमतीशीर शैलीत करण्यात आल्याचं ट्रेलरमध्ये पहायला मिळतं. ए.आर माने, धनश्री गणात्रा अरुण पवार यांनी लिहिलेल्या गीतांना गायक सुरेश वाडकर, हंमसिका अय्यर, आर्या आंबेकर, रोहित राऊत यांचा स्वरसाज लाभला आहे. धनश्री गणात्रा. ए आर माने यांचं संगीत चित्रपटाला लाभलं आहे. पार्श्वसंगीत अवि लोहार यांनी दिलं आहे.

दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखनही सुरेशनंच केलं आहे. सुनील गोडबोले, किशोर ढमाले, अभिलाषा पाटील, वैशाली जाधव, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत जाधव,राणी ठोसर, श्वेता  कुलकर्णी, आरती तांबे, अमोल पठाडे, वैष्णवी अनपट, प्रतीक पडवळ, हनुमंत गणगे प्रीतम साळुंखे, प्रमिला जगताप, महादेव सवई या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. छायांकन विश्वजीत साहू, तर नृत्यदिग्दर्शन राजेश राणे, नंदुकुमार, अमिता कदम यांचं आहे.हेही वाचा  -

जल्लोष 'टकाटक'च्या सक्सेसचा

विणा-हीनाला अडगळीच्या खोलीची शिक्षा
संबंधित विषय
संबंधित बातम्या