Advertisement

विणा-हीनाला अडगळीच्या खोलीची शिक्षा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वेमध्ये हल्ला बोल हे कॅप्टनसी कार्य रंगलं. ज्यामध्ये शिवानीनं बाजी मारून घराची नवी कॅप्टन होण्याचा मान पटकावला.

विणा-हीनाला अडगळीच्या खोलीची शिक्षा
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वेमध्ये हल्ला बोल हे कॅप्टनसी कार्य रंगलं. ज्यामध्ये शिवानीनं बाजी मारून घराची नवी कॅप्टन होण्याचा मान पटकावला. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद, आरोप–प्रत्यारोप झाले, ओढाताणी झाली, पण या सगळ्यावर मात करून शिवानी हा टास्क जिंकली. 

या टास्कमध्ये माधव ज्याप्रकारे खेळला त्याला अभिजीतच्या टीमनं विरोध केला. टास्कच्या आधी नेहा आणि शिवानी तर टास्क दरम्यान हीना आणि शिवानीमध्ये वाद झाला. शिवानी हीनाला तिच्या आईवरून जे काही बोलली ते तिला अजिबात आवडलं नाही, तर रुपालीनंही शिवानी ज्याप्रकारे तिला टास्कमध्ये चांगली खेळली याबद्दल बोलली ते आवडलं नाही आणि तिनं हि गोष्ट विणाला सांगितली. आज घरामध्ये एकला चलो रे हे नॉमिनेशन कार्य रंगणार आहे. तेव्हा या आठवड्यात कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट होणार? ते पहायचं आहे.

या कार्यादरम्यान विणा आणि हीनाला घरामध्ये कुजबुज करण्यास सक्त मनाई आहे अशी घोषणा बिग बॉसनी केली. शिवानीनं या दोघींना अडगळीच्या खोलीमध्ये डांबलं आणि या खोलीमध्ये बोलण्यास मनाई असल्याचं तिनं सांगितलं. त्यावर विणा आणि हीना म्हणाल्या आत आलो आहे ना. मग का नाही बोलायचं? त्यावर शिवानी म्हणाली की, मी कॅप्टन आहे. माझे पण काही नियम असूच शकतात. ही वादावादी आता कोणत्या टोकाला जाते ते पुढे पहायला मिळणार आहे.हेही वाचा  -

मोदींच्या 'मां की रसोई'ला वहिदा-आशाताईंसह पत्की-टिळेकरांचा स्पर्श

Exclusive : चार भाषांमध्ये रिमेकची 'टकाटक' आॅफर!संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा