Advertisement

'बाबा'नं जमवली स्पृहा-अभिजीतची जोडी

सध्या संजय दत्त प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'बाबा' या पहिल्या मराठी चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात प्रथमच अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर यांची जोडी जमली आहे.

'बाबा'नं जमवली स्पृहा-अभिजीतची जोडी
SHARES

सध्या संजय दत्त प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'बाबा' या पहिल्या मराठी चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात प्रथमच अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर यांची जोडी जमली आहे.


प्रथमच एकत्र झळकणार

संजय दत्त आणि मान्यता दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या 'बाबा' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशी आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील गुरु म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. आजवर बऱ्याचदा कार्यक्रमांच्या निमित्तानं एकत्र येणारे स्पृहा आणि अभिजीत चित्रपटामध्ये प्रथमच एकत्र झळकणार आहेत.


९०च्या दशकातील  कथा 

या चित्रपटात स्पृहानं पल्लवीची, तर अभिजीतनं राजनची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाची कथा ९०च्या दशकात घडणारी असल्यानं दोघांनाही तशाच प्रकारचा गेटअप करण्यात आला आहे. आपल्या भूमिकेविषयी स्पृहा म्हणाली की, मी आणि अभिजीत मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहोत. आम्ही दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत आहोत. अभिजीत आणि मी चांगले मित्र आहोत, पण आम्ही याआधी कधीच एकत्र काम केलं नव्हतं. 'बाबा'च्या माध्यमातून ती संधी चालून आली, याचा मला आनंद आहे. 'बाबा' ही नात्यांमधील बंधाची एक सुरेख कथा आहे. आम्हा दोघांमधील केमिस्ट्रीचा प्रश्नच उद्भवला नाही, कारण आम्ही एकमेकांना खूपच चांगलं ओळखतो.


जुन्या लुकमधील भूमिका

सध्या घराघरात गुरू म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिजीतचा 'बाबा'मधील लुक आजवरच्या लुकपेक्षा खूपच वेगळा आहे. आजच्या काळात जुन्या लुकमधील भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यानं एक वेगळ्याच लुकमध्ये स्वत:ला पाहण्याची संधी मिळाल्याचं सांगत अभिजीत म्हणाला की, या चित्रपटात माझा लुक अगदीच वेगळा आहे. बेल बॉटम पँट तसंच चौकोनी आकाराची चष्म्याची फ्रेम या सर्व गोष्टी या व्यक्तिरेखेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळं ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूपच मजा आली. स्पृहा माझी चांगली मैत्रीण आहे. मी तिला खूप वर्षापासून ओळखतो, पण तिच्याबरोबर मी कधीच काम केलं नव्हतं. या चित्रपटाच्या माध्यमातून ही संधी मिळाली याचा मला आनंद आहे.


कोकणात चित्रित 

स्पृहा आणि अभिजीतसोबत या चित्रपटात दीपक दोब्रीयाल आणि नंदिता पाटकर ही जोडी मुख्य भूमिकेत आहे. दीपकचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, कैलास वाघमारे आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही यात भूमिका आहेत. यापूर्वी 'धागा' या झी ५ वर प्रदर्शित झालेल्या मराठी लघुपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या राज आर गुप्ता या तरुणं दिग्दर्शकानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाला रोहन-रोहन यांचं संगीत असून. पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचं आहे. एका ऐकू-बोलू न शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या कोकणात हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे.हेही वाचा  -

जल्लोष 'टकाटक'च्या सक्सेसचा

विणा-हीनाला अडगळीच्या खोलीची शिक्षा
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा