Advertisement

'ओह माय गॉड' पुढच्या वर्षी होणार 'फिर हेरा फेरी'

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ट्विटरवरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

'ओह माय गॉड' पुढच्या वर्षी होणार 'फिर हेरा फेरी'
SHARES

'हेरी फेरी' आणि 'ओह माय गॉड' या हिट विनोदी चित्रपटांचा सिक्वेल पुढील वर्षी रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ट्विटरवरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी दोन्ही चित्रपट येत आहेत, असे त्यांनी ट्विट केलं आहे.

परेश रावल यांच्या ट्विटनुसार 'हेरी फेरी', 'ओह माय गॉड' या दोन्ही चित्रपटांचा सीक्वेल पुढील पावसाळ्यापूर्वी प्रेक्षकांसमोर येईल. दोन्ही चित्रपटांमध्ये बॉलिवूडची हिट कॉमेडी जोडी परेश रावल आणि अक्षय कुमार यांनी अभिनय केला होता.

२००० मध्ये रिलीज झालेल्या 'हेरा फेरी'मध्ये परेश यांच्या व्यतिरिक्त सुनील शेट्टी, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. कुलभूषण खरबंदा, गुलशन ग्रोव्हर आणि ओमपुरी यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुमारे २२ कोटींचा व्यवसाय केला होता. यानंतर 'फिर हेरा फेरी' चित्रपटाचा दुसरा भाग वर्ष २००६ मध्ये प्रदर्शित झाला. १८ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची उलाढाल ६९ कोटींपेक्षा जास्त होती.

'ओह माय गॉड' २०१२ मध्ये रिलीज झाला होता. परेश रावल यांनी या चित्रपटात नास्तिक व्यक्तीची भूमिका केली होती. तर अक्षय कुमार भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत होता



हेही वाचा

'हंगामा २' चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा