Advertisement

टोरंटोमध्येही आकाश होणार गुलाबी

भारतीय चित्रपटांना कायम देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचं स्थान लाभलं आहे. आता 'द स्काय इज पिंक' या आगामी चित्रपटाची टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्णी लागली आहे.

टोरंटोमध्येही आकाश होणार गुलाबी
SHARES

भारतीय चित्रपटांना कायम देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचं स्थान लाभलं आहे. आता 'द स्काय इज पिंक' या आगामी चित्रपटाची टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्णी लागली आहे.


११ आॅक्टोबरला प्रदर्शित

होय, आता टोरंटोमधील आकाशही गुलाबी होणार आहे. कारण तिथं संपन्न होणाऱ्या महत्त्वाच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'द स्काय इज पिंक' हा भारतीय चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या आनंदाच्या बातमीसोबतच प्रोडक्शन हाऊसच्या वतीनं 'द स्काय इज पिंक'च्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. यंदा ११ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आरएसव्हीपी आणि रॅाय कपूर फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केलं आहे.


शोनाली बोस पुन्हा प्रकाशझोतात

राष्ट्रीय पुरस्कारांसोबतच जगभरातील बऱ्याच मानाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या शोनाली बोस यांनी दिग्दर्शित केलेल्या 'अमू' या चित्रपटाचं खूप कौतुक झालं होतं. याखेरीज 'चित्तगोंग' आणि 'मार्गरीटा विथ स्ट्रॅा' अशा प्रवाहापेक्षा वेगळ्या धाटणीचं कथानक सादर करणाऱ्या चित्रपटांचं शोनाली यांनी दिग्दर्शन केलं आहे. आता 'द स्काय इज पिंक'च्या निमित्तानं त्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत. प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित सराफ आदी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्यानं 'द स्काय इज पिंक' या हिंदी चित्रपटाला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. या चित्रपटाचं लेखन शोनाली यांनी जुही चतुर्वेदी आणि निलेश मनियार यांच्यासोबत केलं असून, संगीत प्रीतम यांचं आहे.



हेही वाचा -

'टकाटक'ची सक्सेस पार्टी! नक्की बघा, कोण काय म्हणालं

थिएटरमध्ये जाऊन बघा ‘उरी’ सिनेमाचा मोफत शो, ‘कारगिल विजय दिनी’ सरकारचं गिफ्ट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा