SHARE

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘टकाटक’ या चित्रपटाचीच चर्चा आहे. चौथ्या आठवड्यापर्यंत बॅाक्स आॅफिसवर मिळालेलं यश 'टकाटक'च्या टीमनं सक्सेस पार्टीच्या रूपात साजरं केलं. अंधेरीतील सिन सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘टकाटक’च्या सक्सेस पार्टीमध्ये निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसह तंत्रज्ञांनीही धमाल केली.

चौथ्या आठवड्यातही २०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये सुरू असलेल्या या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला दिग्दर्शक मिलिंद कवडेसह प्रथमेश परब, रितीका श्रोत्री, अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर या कलाकारांसह निर्माते ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनीही हजेरी लावली होती. जय अत्रे आणि वरुण लिखते या जोडीची ‘आपला हात जगन्नाथ…’ आणि ‘या चंद्राला या…’ ही गाणी गाजत आहे. या आनंदाचं सेलिब्रेशन ‘टकाटक’च्या टीमनं केक कापून साजरं केलं.
संबंधित विषय
ताज्या बातम्या