Advertisement

ड्रग्स फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर सोसायटीत देखील आहे : जावेद अख्तर

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेता जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत ड्रग्स आणि नेपोटिझमच्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले आहे.

ड्रग्स फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर सोसायटीत देखील आहे : जावेद अख्तर
SHARES

सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा मुद्दा जोर धरू लागला आहे. सोशल मीडियावर लोकांनी बॉलिवूड स्टार्ससह स्टारकिड्सलाही ट्रोल केलं जात आहे.

दुसरीकडे सुशांतच्या वडिलांनी प्रेयसी रिया चक्रवर्तीवर आत्महत्या आणि पैशाची लूट करण्यासह अनेक गंभीर आरोप केले. मग ड्रग अँगल उघडकीस आला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या मुलांना टार्गेट केलं जात आहे. या सर्वांमुळे बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाले. 

पहिल्या गटात कंगना रनौत, शेखर सुमन, अंकिता लोखंडे यांच्यासह अनेक तार्‍यांनी सुशांतच्या न्यायासाठी बाजू मांडली. त्यांनी रिया चक्रवर्तीलाा सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलं गेलं. अन्य गटात जावेद अख्तर, जावेद अख्तर, अनुराग कश्यप, विद्या बालन, तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांच्यासह अनेक स्टार्सनी रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला आहे. 

या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेता जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. ड्रग्जच्या विषयावर ते म्हणाले की, "मी ऐकले आहे की तरुण लोक अंमली पदार्थांचे सेवन करतात. परंतु ते फक्त चित्रपटसृष्टीतच नाही, ही सध्याची समाजाला लागलेली किड आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे."

एवढंच नव्हे तर बॉलिवूडमधील नेपोटिझनवरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "वारसा चालवण्याला आपण नेपोटिझन म्हणून शकत नाही. कारण चित्रपट कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीचा नेहमीच एक पाय दरवाजाजवळ असतो, जरी तो सर्वांसाठी सारखा नसतो."



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा