जॉननं सोडला 'सरफरोश'चा सिक्वल, नव्या अभिनेत्याचा शोध सुरू

चित्रपटाची स्क्रिप्ट देखील जॉनला आवडली होती. पण आता त्याच्या नकार देण्यानं चित्रपटात कुणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

SHARE

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरफरोश' या आमिर खान स्टारर चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये जॉन अब्राहमला घेण्यात आलं होतं. पण आता जॉननं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. स्क्रिप्ट देखील त्याला आवडली होती. पण आता त्याच्या नकार देण्यानं चित्रपटात कुणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

... म्हणून दिला नकार

गेल्या वर्षी या चित्रपटासाठी त्याच्याशी संपर्क साधला होता. परंतु पाइपलाइनमधील बऱ्याच चित्रपटांमुळे त्याला या चित्रपटासाठी तारखा काढता आल्या नाहीत. त्याच्या वतीनं प्रयत्नदेखील सुरू होते. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथननं तेव्हापासून आतापर्यंत जॉनची वाट पाहिली. शेवटी दोघांमध्ये काही जमलं नाही.

आमिरसोबत पुन्हा संपर्क?

स्टुडिओच्या बळावर दिग्दर्शक आमिर खानबरोबर मीटिंग करू शकतात. 'सरफरोश २' ची कथा पहिल्या भागाच्या २० वर्षांपुढची आहे. काळ पुढे सरकल्यामुळे आमिरच्या व्यक्तिरेखेला डीजीपी म्हणून दाखवावं लागलं असतं, असं मत दिग्दर्शकानं मांडलं. अजयसिंग राठोड या व्यक्तिरेखेच्या कुटुंबाला परत आणणं कठीण झालं असतं. त्यामुळे गेल्या वर्षी जॉनला या स्क्रिप्टमध्ये घेण्यात आलं होतं. यात त्याला पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत घेतलं होतं. आता जॉनच्या जागी चांगल्याच अभिनेत्याला घेण्याचा प्रयत्न सुरू आहेहेही वाचा

'या' तारखेला प्रदर्शित होणार हिना खानचा पहिला चित्रपट

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल


संबंधित विषय
ताज्या बातम्या