Advertisement

'या' तारखेला प्रदर्शित होणार हिना खानचा पहिला चित्रपट

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हॅक्ड हे हिनाच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाचं नाव आहे.

'या' तारखेला प्रदर्शित होणार हिना खानचा पहिला चित्रपट
SHARES

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हॅक्ड हे हिनाच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याचदिवशी हिनाचा वाढदिवस असतो.

'यावर' चित्रपट आधारीत

हिनानं चित्रपटातील तिची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या पोस्टमध्ये तिनं चित्रपट ३१ जानेवारीला २०२० ला प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. चित्रपटात डिजिटल आणि सोशल मीडियाच्या निगेटिव्ह बाजूवर भाष्य करण्यात आलं आहे.अशी आहे हिनाची भूमिका...

सोशल मीडियावर खासगी माहिती शेअर करणं किती घातक ठरु शकतं, याविषयी चित्रपटात सांगण्यात आलं आहे. यात हिनानं एका फॅशन मॅगझिनच्या एडिटरची भूमिका साकारली आहे. तिचे पात्र अतिशय ग्लॅमरस दाखवण्यात आलं आहे. हिनासह रोहन शाह, मोहित मल्होत्रा आणि सिड मक्कड यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अमर पी ठक्कर आणि कृष्णा भट्ट यांनी केली आहे.हेही वाचा

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

सुजॉय घोषच्या 'कहानी ३’ची स्टोरी आधीच लिक, पण 'हा' आहे ट्विस्ट


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement