Advertisement

... तर पॅार्नस्टार बनली असती कंगना?

२३ मार्च हा कंगनाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं एक मुलाखत देताना कंगनानं आपल्या आयुष्यातील फार मोठं रहस्य उलगडलं आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत जर एंट्री मिळाली नसती, तर मी पॅार्नस्टार बनले असते असं कंगनानं एका मुलाखतीत म्हटलं आहे.

... तर पॅार्नस्टार बनली असती कंगना?
SHARES

आज कंगना रनौत हे हिंदी सिनेसृष्टीतील एक वेगळं प्रस्थ आहे. 'मणिकर्णिका'सारखा महत्त्वपूर्ण सिनेमा स्वबळावर यशस्वी करणाऱ्या कंगनानं आपल्या बेधडक बोलण्यामुळं फिल्म इंडस्ट्रीत बरेच शत्रू बनवले आहेत. इंडस्ट्रीतील शत्रूंची तिला मुळीच पर्वा नाही, पण जर ती आज इथे नसती, तर कुठे असती याचं उत्तर तिनं स्वत:चं देत खळबळ उडवून दिली आहे.


बड्या व्यक्तींसोबत वाद 

कंगनाचे फिल्म इंडस्ट्रीतील काही बड्या व्यक्तींसोबतचे वाद कोणापासूनही लपून राहिलेले नाहीत. कोणी कितीही मोठा असला तरी त्याच्याशी थेट भिडत कंगनाची यशस्वी वाटचाल आजही सुरू आहे. २३ मार्च हा कंगनाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं एक मुलाखत देताना कंगनानं आपल्या आयुष्यातील फार मोठं रहस्य उलगडलं आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत जर एंट्री मिळाली नसती, तर मी पॅार्नस्टार बनले असते असं कंगनानं एका मुलाखतीत म्हटलं आहे.


डॅाक्टर बनवायचं होतं

कंगना आज ज्या ठिकाणी पोहोचली आहे तिथे पोहोचण्यासाठी तिने फार मोठा स्ट्रगल केला आहे. कोणीही गॅाडफादर नसताना कंगनानं आपलं वेगळं एम्पायर उभारलं आहे. हिमाचल प्रदेशमधील मनाली जवळ वसलेल्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या कंगनानं अॅक्टिंगच्या वेडापायी घरदार सोडलं. वडील कॅान्ट्रॅक्टर आणि आई शिक्षिका असलेल्या कंगनाच्या पालकांना तिला डॅाक्टर बनवायचं होतं, पण कंगनाला मात्र अॅक्टरचं बनायचं होतं.


दिल्लीनंतर मुंबईत

अॅक्टिंगचं हे वेड कंगनाला प्रथम दिल्ली आणि नंतर मुंबईत घेऊन आलं. कोणाचाही असरा नसताना कामाच्या शोधात भटकणाऱ्या कंगनाला कुठून तरी फिल्म इंडस्ट्रीत दाखल होण्याची वाट शोधायची होती. आपल्या या प्रवासाबाबत कंगनानं सांगितलं की, हिंदी सिनेसृष्टीत दाखल होण्यापूर्वी मला एका अॅडल्ट सिनेमाची अॅाफर आली होती. ती मी साईनही केली होती. त्या सिनेमाचं फोटोशूट करण्यासाठी तिथे पोहोचले, तेव्हा तिथल्या सर्व गोष्टी मला खूप विचित्र वाटल्या. डोळ्यांसमोरील चित्र चुकीचं असल्याचं जाणवत होतं, पण काम नसल्यानं ते करायचं मी ठरवलं होतं. त्यावेळी अनुराग बसूनं मला 'गँगस्टर' सिनेमाची भूमिका दिली नसती तर कदाचित आज मी पॅार्न इंडस्ट्रीत असते.


गँगस्टर सिनेमानं संधी

कंगनानं व्यक्त केलेलं मनोगत ऐकल्यानंतर तिच्यासारख्या कित्येक अॅक्टिंगवेड्या तरुणी कशा प्रकारे पॅार्न इंडस्ट्रीचा भाग बनत असतील याचा अंदाज येतो. चित्रपटसृष्टीशी निगडीत एखाद्या मुद्द्याबाबत ती का इतक्या तळमळीनं बोलते याची जाणीवही होते. एखाद्याचं नशीब त्याला कुठं घेऊन जाऊ शकतं आणि त्याची मेहनत त्याला कुठे नेऊन ठेवू शकते हे कंगनाकडं पाहिल्यावर जाणवतं. 'गँगस्टर' या सिनेमानं कंगनासाठी पॅार्न इंडस्ट्रीचं दार बंद केलं आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीचं उघडलं.



हेही वाचा -

Movie Review : लढवय्या शीखांच्या वीरगाथेचं 'केसरी' प्रतिबिंब

'हा' आहे ऋतिकचा अनोखा फंडा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा