लोकप्रियतेत करणनं मारली बाजी

आपल्या चित्रपटांइतकाच सोशल मीडियामध्येही चर्चेत असणाऱ्या फिल्ममेकर करण जोहरनं लोकप्रियतेच्या बाबतीत बाजी मारत नंबर वन पोझिशन पटकावली आहे.

SHARE

आपल्या चित्रपटांइतकाच सोशल मीडियामध्येही चर्चेत असणाऱ्या फिल्ममेकर करण जोहरनं लोकप्रियतेच्या बाबतीत बाजी मारत नंबर वन पोझिशन पटकावली आहे. 


फिल्ममेकर्सची लिस्ट 

फिल्ममेकर करण जोहरनं बॉलीवूडच्या लोकप्रिय फिल्ममेकर्सच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियानं गेल्या सहामाहीतील बॉलीवूडमधल्या सर्वाधिक लोकप्रिय फिल्ममेकर्सची एक लिस्ट जाहिर केली आहे, ज्यामध्ये करण लोकप्रियतेत अग्रेसर असल्याचं दिसून आलं आहे. या यादीत करण पहिल्या क्रमांकावर, तर '२.०'चा दिग्दर्शक शंकर दुसऱ्या स्थानी, फरहान अख्तर तिसऱ्या क्रमांकावर, रोहित शेट्टी चौथ्या स्थानी आणि अनुराग कश्यप पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीनं लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली आहे.


करणला १०० गुण 

'सिंबा', 'केसरी', 'कलंक' आणि 'स्टुडंट ऑफ दि इयर २' या चित्रपटांमुळे करण बॉलीवूड फिल्ममेकर्समध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला. करणचा 'कॉफ़ी विथ करण सीजन ६' सुद्धा लोकप्रिय ठरला. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्यानुसार, व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट, डिजिटल, सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट्स अशा लोकप्रियतेच्या सर्व श्रेणींमध्ये करण १०० गुणांसह पहिल्या पदावर आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले लोकप्रिय फिल्ममेकर शंकर ८९.१५ गुणांसह लोकप्रियतेत दुसऱ्या स्थानावर आहेत. रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर '२.०' चे दिग्दर्शक शंकर यांना डिजीटल श्रेणीमध्ये ९३.०७ गुण, व्हायरल न्यूज श्रेणीमध्ये १७ गुण आणि न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये १०० गुणा मिळाल्यानं त्यांना लोकप्रियतेत दुसरं स्थान मिळालं आहे.


फरहान तिसऱ्या क्रमांकावर

फिल्ममेकर फरहान अख्तर तिसऱ्या क्रमांकावर आहे. चित्रपट 'गली बॉय' आणि वेबसीरिज 'मेड इन हेवन'ची लोकप्रियता, तसंच मॉडेल शिवानी दांडेकरसोबतच्या डेटिंगच्या न्यूजमूळं फरहानला लोकप्रियतेत तिसरे स्थान मिळालं आहे. फिल्ममेकर आणि टेलीव्हिजनचा लोकप्रिय होस्ट रोहित शेट्टी ३०.२४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आपली ब्लॉकबस्टर फिल्म 'सिंबा' आणि 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोच्या सर्वाधिक टीआरपीमुळं रोहित चौथ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यापासून 'सूर्यवंशी' सिनेमाविषयी मीडियामध्ये छापून येत असलेल्या न्यूजमूळेही रोहित शेट्टी सतत चर्चेत राहिला आहे.


अनुराग मीडियाच्या मथळ्यांमध्ये

नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय वेबमालिका 'सॅक्रेड गेम्स'चा निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप 'सॅक्रेड गेम्स २'च्या उत्सुकतेमुळं सतत चर्चेत राहिला आहे. हृतिक रोशन स्टारर 'सुपर ३०' या चित्रपटाची निर्मितीही अनुरागनेच केली आहे. या सिनेमाच्या सातत्याने होत असलेल्या कॉन्ट्रोवर्सीमुळं आणि सोशल मीडियावर आपल्या बेधडक विधानांमुळं अनुराग मीडियाच्या मथळ्यांमध्ये सातत्यानं चर्चेत राहिला आहे. याखेरीज नुकताच रिलीज झालेला अनुरागचा 'गेम ओव्हर' हा चित्रपटसुध्दा त्याला लाइमलाईटमध्ये ठेवण्यासाठी कारणीभूत ठरला आहे.हेही वाचा -

बिग बॉस कोण उंचावणार 'मनोरा विजयाचा'?

Movie Review : स्त्रीनं समाजव्यवस्थेशी दिलेला सशक्त लढा
संबंधित विषय
ताज्या बातम्या