Advertisement

बिग बॉस कोण उंचावणार 'मनोरा विजयाचा'?

सोमवार उजाडला की सर्वांनाच वेध लागतात बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मिळणाऱ्या टास्कचे, पण त्या पूर्वी या घरात कॅप्टन्सीसाठी लढत रंगल्याचं पहायला मिळणार आहे.

बिग बॉस कोण उंचावणार 'मनोरा विजयाचा'?
SHARES

सोमवार उजाडला की सर्वांनाच वेध लागतात बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मिळणाऱ्या टास्कचे, पण त्या पूर्वी या घरात कॅप्टन्सीसाठी लढत रंगल्याचं पहायला मिळणार आहे.


नवीन कॅप्टन निवडणार

बिग बॉस मराठीच्या घरामधून विद्याधर जोशी घराबाहेर पडले आहेत. आता घरामध्ये नवीन कॅप्टन निवडला जाणार आहे. बिग बॉस सदस्यांवर 'मनोरा विजयाचा' हे कार्य सोपवणार आहेत. किशोरी शहाणे आणि शिव ठाकरे हे कार्य पार पाडतील. ज्यामध्ये त्यांना  समर्थकांकडून आपआपले ठोकळे जमवून त्याचा मनोरा बनवायचा आहे, तसंच तो मनोरा समर्थकांच्या मदतीनं टिकवून ठेवायचा आहे. कार्याच्या शेवटी ज्या उमेदवाराचा मनोरा दुसऱ्या उमेदवाराच्या मनोऱ्यापेक्षा मोठा आणि सुस्थितीत दिसेल तो उमेदवार या आठवड्यामध्ये घराचा नवीन कॅप्टन म्हणून घोषित होईल.


पुरुषांना सल्ला 

टास्क दरम्यान सदस्यांमध्ये भांडण, वाद–विवाद हे होणारच. या टास्क दरम्यान माधव आणि विणामध्ये पुन्हा एकदा वाद होणार आहे. वादाच्या या गदारोळात शिव आणि किशोरी यांच्यात कोण बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन बनतो हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यासोबतच सुरेखा पुणेकरही पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्याचं पहायला मिळणार आहे. सुरेखा यांनी सगळ्या पुरुषांना एक सल्ला दिला. हा सल्ला बिग बॉसच्या घरातील किती पुरूष मान्य करून तो कृत्यात आणतात ते देखील पहायचं आहे.


पुरुष स्वयंपाक करणार 

'पुरूषांनो स्वावलंबी व्हा, स्वयंपाक करायला शिका', असं सुरेखा पुणेकर यांनी बिग बॉसच्या घरातील पुरुषांना सांगितलं आहे. त्याचं झाल असं की, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळे पुरुष मिळून स्वयंपाक करणार आहेत, त्यामुळं घरातील बायकांना आराम मिळणार आहे. यावरूनच सुरेखा यांनी सगळ्या पुरूषांना संदेश दिला. स्वयंपाकाबद्दल अडाणी राहू नका, स्वयंपाक शिका म्हणजे घरातील स्त्रीला बाहेर जाता येईल, मज्जा करता येईल. कुठलाही पुरुष कितीही कष्ट करत असला तरीदेखील त्याला एखादी गोष्ट तयार करता आलीच पाहिजे.  भूक लागली तर स्वत: करून खाऊ शकतो.




हेही वाचा -

अभिजीत बिचकुलेचा जामीन फेटाळला, आणखी काही दिवस राहावं लागणार तुरूंगात

Movie Review : स्त्रीनं समाजव्यवस्थेशी दिलेला सशक्त लढा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा