Advertisement

अभिजीत बिचकुलेचा जामीन फेटाळला, आणखी काही दिवस राहावं लागणार तुरूंगात

चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असला, तरी २०१२ मधील खंडणी प्रकरणात जामीन फेटाळल्याने त्याला आणखी काही दिवस तुरूंगात रहावं लागणार आहे.

अभिजीत बिचकुलेचा जामीन फेटाळला, आणखी काही दिवस राहावं लागणार तुरूंगात
SHARES

सातारा न्यायालयाने ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असला, तरी २०१२ मधील खंडणी प्रकरणात जामीन फेटाळल्याने त्याला आणखी काही दिवस तुरूंगात रहावं लागणार आहे.  

सेटवरच अटक

चेक बाऊन्स प्रकरणात सातारा न्यायालयाने बिचुकलेविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले. बिचकुले बिग बाॅसचा स्पर्धक असल्याने तसंच या शो चा सेट गोरेगाव फिल्म सिटी इथं असल्याने सातारा पोलिसांनी आरे पोलिसांची मदत घेतली. त्यानुसार २१ जून रोजी बिचकुलेला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली. शनिवारी सातारा न्यायालयात हजर केलं असता त्याची रवानगी सातारा जिल्हा तुरूंगात करण्यात आली. 

कोण आहे बिचुकले?

बिचुकलेने आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका लढवल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही बिचकुलेने अनेकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.



हेही वाचा-

बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक

Movie Review : स्त्रीनं समाजव्यवस्थेशी दिलेला सशक्त लढा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा