बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना अटक करण्यात आली आहे. साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी त्यांना बिग बॉसच्या घरातूनच अटक झाली आहे.

बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक
SHARES

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक करण्यात आली आहे. साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी बिचकुलेला बिग बॉसच्या घरातूनच अटक झाली आहे. आरे पोलिसांच्या मदतीनं सातारा पोलिसांनी बिचुकलेला अटक करण्यात आली आहे.

३५ हजारांचा चेक

आरे पोलिसांच्या मदतीनं सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं अभिजित बिचुकलेला गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यात याप्रकरणी भा. दं. वि. कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल होता. तसंच, ३५ हजारांचा चेक बाऊंस झाल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

वॉरंट जारी

चेक बाऊन्स प्रकरणात सातारा कोर्टानं बिचुकलेविरोधात वॉरंट जारी केलं असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी सातारा पोलिस मुंबईत दाखल झाले. बिग बॉस मराठी २ सीझनचा सेट मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. त्यामुळं सातारा पोलिसांनी अटकेच्या कारवाईसाठी मुंबई पोलिसांची मदत मागितली होती. अभिजीत बिचुकलेला अटक केल्यानंतर कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकले स्पर्धेत कायम राहणार की इथंच त्याचा घरातील प्रवास संपणार, तसंच यावर कलर्स मराठी वाहिनी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

ताजमहल नव्हे, धारावी देशातील लोकप्रिय पर्यटनस्थळ

मुंबई-नाशिक, पुणे मार्गावर धावणार मेमूसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा