Advertisement

मुंबई-नाशिक, पुणे मार्गावर धावणार मेमू

मध्य रेल्वेच्या मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक या मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर बनवण्यात आलेली पहिली मेमू गाडी चालविण्यात येणार आहे.

मुंबई-नाशिक, पुणे मार्गावर धावणार मेमू
SHARES

मध्य रेल्वेच्या मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक या मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर बनवण्यात आलेली पहिली मेमू गाडी चालविण्यात येणार आहे. चेन्नईतील रेल्वे कारखान्यातून ही गाडी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली आहे. या गाडीच्या चाचण्या पुढील आठवड्यात पुणे आणि नाशिक मार्गावरील घाट भागात घेण्यात येणार आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यास मुंबई ते पुणे आणि नाशिक मार्गावर लोकलऐवजी मेमू चालविण्यात येणार आहे.

३ मार्गांवर 

मध्य रेल्वेनं प्रवाशांचा प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) मुंबई -पुणे, मुंबई-नाशिक व मुंबइ-बडोदा या ३ महत्त्वाच्या मार्गांवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते पुणे आणि नाशिक या मार्गावर लोकल चालविणं शक्य नसल्यानं मेमू मुंबई ते बडोदा या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर मेमूची चाचणी घेण्यात येणार आहे.

१८ डब्यांची मेमू

मेमूमध्ये २ हजार ६१८ प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे. यामध्ये ७४४ प्रवासी बसून प्रवास करू शकतात. तसंच, मेमू १८ डब्यांची असून, प्रति तास ११० ते १३० किमीचा वेगानं धावणार आहे. या मेमूमध्ये टॉक बॅक यंत्रणा, स्टेनलेस स्टीलचा वापर, आधुनिक बसण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांसाठी उद्घोषणा यंत्रणा आणि जीपीएस असणार आहे.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेची तिसरी एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल

पालिकेवर टीका करणाऱ्या आरजे मलिष्काला पालिका आयुक्तांनी दिली पावसाळापूर्व कामाची माहिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा