Advertisement

पश्चिम रेल्वेची तिसरी एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण, मेक इन इंडिया अंतर्गत मेधा बनावटीची एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे.

पश्चिम रेल्वेची तिसरी एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण, मेक इन इंडिया अंतर्गत मेधा बनावटीची एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे. या एसी लोकलची चाचणी मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते कसारा स्थानकादरम्यान घेण्यात येणार आहे. त्यानंतर ती पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

प्रत्येकी ६ एसी लोकल

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मार्च २०२० पर्यंत प्रत्येकी ६-६ एसी लोकल दाखल होणार आहेत. यांपैकी २ एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर दाखल झाल्या आहेत. तसंच, नुकताच दाखल झालेली तिसरी एसी लोकल ही मेक इन इंडिया अंतर्गत मेधा बनावटीची आहे. मध्य रेल्वे मार्गावरून एसी लोकलच्या चाचणीचं निरीक्षण करण्यासाठी आरडीएसओचं अधिकारी मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती मिळते.

एसी लोकलची चाचणी

तिसऱ्या एसी लोकलची चाचणी कल्याण ते कसारा स्थानकादरम्यान करण्यात येणार आहे. त्यानंतर ती पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मात्र, या एसी लोकलची चाचणी यशस्वी झाल्यास भविष्यात त्या मध्य रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही ऑनलाइन परवानगी

पदवी प्रवेशांसाठी कला शाखेचा कटऑफ दुसऱ्या यादीतही जास्तच



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा