Advertisement

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही ऑनलाइन परवानगी

गेल्या वर्षीप्रमाणं यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे. मंडळाच्या अर्जदारांना आता घरबसल्या ऑनलाइन अर्ज व कार्यवाही करता येणार असल्यानं त्यांचा वेळ वाचणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही ऑनलाइन परवानगी
SHARES

गेल्या वर्षीप्रमाणं यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे. मंडळाच्या अर्जदारांना आता घरबसल्या ऑनलाइन अर्ज व कार्यवाही करता येणार असल्यानं त्यांचा वेळ वाचणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मुदत १९ ऑगस्टपर्यंत संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत असणार आहे. मात्र, मागील वर्षी झालेल्या प्रचंड गोंधळाच्या पार्श्वभूमीवर १२ हजारांवर मंडळांना परवानगी देऊन संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचं आव्हान पालिकेसमोर असणार आहे.

पालिकेची परवानगी

मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात १२ हजारांवर गणेशोत्सव मंडळं आहेत. या मंडळांना उत्सव साजरा कण्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागते. तसंच यासाठी अर्ज करताना, त्यासोबत मुंबई पोलिस व वाहतूक पोलिसांचे 'ना-हरकत प्रमाणपत्र'ही आवश्यक असतं. यामध्ये अर्जदारांचा बराच वेळ जात असल्याचं लक्षात घेत पालिकेनं मुंबई पोलिसांच्या सहकार्यानं ही परवानगी प्रक्रिया मागील वर्षापासून मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून ऑनलाइन केली आहे.

'एक खिडकी’ योजना

महापालिकेनं मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे. पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर सादर होणारा अर्ज स्वयंचलित पद्धतीनं पोलिसांकडं व वाहतूक पोलिसांकडं जाऊन कार्यवाही होणार आहे. परंतु, ऑनलाइन प्रक्रियेत अनेक वेळा वेबसाइट हँग झाल्यानं आणि ऑनलाइन अर्ज करताना मंडळांना तांत्रिक अडचणी आल्यानं प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळं सार्वजनिक गणेशोत्सव समितीसह अनेक मंडळांनी अर्ज करण्यासाठी पालिकेकडं ऑफलाइन सुविधा सुरू करण्याची मागणी केली होती.

-मेलद्वारे अर्ज मंजूर

पोलिस व वाहतूक पोलिसांनी अर्ज प्राप्त झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत त्यांची 'हरकत' किंवा 'ना-हरकत' नोंदविणं अपेक्षित आहे. 'ना-हरकत' दिल्यानंतर अर्जावर पालिकेच्या प्रभाग कार्यालयाद्वारे आवश्यक ती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनंच करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित अर्जदारास ई-मेलद्वारे अर्ज मंजूर झाल्याची माहिती दिली जाणार आहे. याच ई-मेलमध्ये परवानगीसाठी आवश्यक ते शुल्क कसे भरावे? याचाही तपशील असणार आहे. -मेलमध्ये दिलेल्या तपशीलानुसार अर्जदारानं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पालिकेकडं शुल्क जमा करायचे आहे.

गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्यात येणार असली तरी बाहेरून तयार मूर्ती आणून विकणाऱ्यांना मंडप बांधण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. मंडप बांधण्याची परवानगी फक्त स्वतः मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांनाच देण्यात येणार आहे. ही परवानगी विभाग कार्यालयाकडून ऑफलाइन पद्धतीनंच देण्यात येणार आहे.



हेही वाचा -

पदवी प्रवेशांसाठी कला शाखेचा कटऑफ दुसऱ्या यादीतही जास्तच

बेस्टचं किमान तिकीट होणार ५ रुपये?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा