Advertisement

रणवीर-दीपिकाचं ब्रेकअप होणार...

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची घाई त्यांच्यापेक्षा त्यांच्या चाहत्यांनाच जास्त आहे. पण त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच या दोघांचं ब्रेकअप होणार आहे.

रणवीर-दीपिकाचं ब्रेकअप होणार...
SHARES

गेल्या वर्षी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लग्नबंधनात अडकल्यानंतर लवकरच दीपिका आणि रणवीर लग्न करणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं होतं. या बातम्यांनंतर या दोघांचा चाहतावर्ग फार खूष झाला होता. या दोघांच्या लग्नाची घाई रणवीर- दीपिकापेक्षा त्यांच्या लग्नाची घाई ही त्यांच्या चाहत्यांनाच आहे. पण त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच या दोघांचं ब्रेकअप होणार आहे.



रणवीर आणि दीपिकाबद्दलच्या या बातमीचा खुलासा त्या दोघांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने केला आहे. रणवीर आणि दीपिकाचं ब्रेकअप होणार याचा खुलासा करण जोहरने एका रेडिओ शो वर बोलताना केला आहे. रेडिओ शोमध्ये रिजर्व रॅपिड फायर राऊंड सुरू होता. तेव्हा एका कॉलरने करणला प्रश्न विचारला की, बॉलिवूडमध्ये कोणतं असं कपल आहे ज्यांचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमुळे ब्रेकअप होऊ शकतं?

या प्रश्नावर उत्तर देताना करण म्हणाला, रणवीर आणि दीपिकाला कायम एकमेकांची गरज असते. पण कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे ते एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या दोघांचं ब्रेकअप होऊ शकतं. करणच्या या उत्तरानंतर दीपिका-रणवीरचे चाहते मात्र चांगलेच नाराज झाले आहेत.



नुकताच या दोघांचा 'पद्मावत' हा चित्रपट प्रदर्शित झाला. रणवीर सिंग सध्या 'गली बॉय' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर दीपिका इरफान खानबरोबर चित्रपटाचं शुटिंग सुरू करणार होती. मात्र सध्या इरफान न्युरो एंडोक्राइन ट्यूमर या आजाराने त्रस्त असल्यामुळे त्यावर उपचार घेत आहे.



हेही वाचा

रणवीर सिंगच्या बँक लॉकरमध्ये कुणाची पत्र?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा