स्वच्छता अभियानासाठी दबंग खानचा पुढाकार


  • स्वच्छता अभियानासाठी दबंग खानचा पुढाकार
SHARE

मुंबई - अभिनेता सलमान खान यांनी पालिकेच्या 'हागणदारी मुक्त' मोहिमेसाठी पुढाकार घेतलाय. त्यासाठी शनिवारी त्यांनं पालिका मुख्यालयात येऊन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या मोहिमेसाठी 'सदिच्छा दूत' म्हणून कार्य करण्याची त्यानं तयारी दाखवलीय. तसंच बिईंग ह्यूमन या संस्थेद्वारे महापालिकेला पाच अत्याधुनिक फिरती शौचालयं देणार असल्याचंही जाहीर केलंय. आपली मुंबई हे आपले घर आहे असं समजून ती स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करा, असंही आवाहन सलमान खाननं केलंय.

याप्रसंगी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उपायुक्त रमेश पवार, ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, बिईंग ह्यूमनच्या अलविरा खान आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या