Advertisement

क्रिती सॅनॉनच्या 'मीमी'चा ट्रेलर प्रदर्शित, या दिवशी होणार रिलिज

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ‘मीमी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

क्रिती सॅनॉनच्या 'मीमी'चा ट्रेलर प्रदर्शित, या दिवशी होणार रिलिज
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ‘मीमी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच ‘मीमी’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. क्रितीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

ट्रेलरमध्ये असं दर्शवलं गेलं आहे की, क्रिती ही मध्यम कुटुंबातील मुलगी आहे. या ट्रेलरमध्ये क्रितीला एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी विचारण्यात येतं. सरोगेट आई बनण्यासाठी तिंला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. यानंतर मिमी (कृती सॅनॉन) तत्काळ या कामासाठी तयार होते.

इथून खरी मजा सुरू होते. आता मीमी गर्भवती आहे. पण अचानक तिच्या समोर एक सत्य समोर येतं आणि इतूनच चित्रपटाच्या कथेला कलाटणी मिळते. ते जोडपे काही महिन्यांनंतर त्यांना ते बाळ नको असं सांगतं. पण, क्रिती गर्भपात करण्यासाठी तयार नसते. त्यातच तिच्या गरोदरपणाबद्दल घरी कळतं. पण खरं लपवण्यासाठी ती हे बाळ पंकज त्रिपाठीचं असल्याचं सांगते.

ट्रेलरमधूनच असा अंदाज बांधला जाऊ शकतो की, कृती चित्रपटामध्ये पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली आहे. ट्रेलरमध्येच ती अप्रतिम दिसत आहे. पंकज त्रिपाठीही या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले आहेत. प्रत्येक वेळेप्रमाणे पंकजसुद्धा इथंही सशक्त भूमिकेत दिसला आहे. . क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारताना सई ताम्हणकर दिसत आहे.

या चित्रपटात सुप्रिया पाठक, मनोज पाहवा, सई ताम्हणकर यांसारख्या कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे, तर हा चित्रपट ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा